बांधकाम करताना विहिरीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:24 IST2021-03-19T04:24:32+5:302021-03-19T04:24:32+5:30

तुरंबे : कपिलेश्वर (ता. राधानगरी) येथे विहिरीचे बांधकाम करत असताना दशरथ ज्ञानदेव तोरस्कर (वय ४२) या बांधकाम कामगाराचा पाय ...

Worker dies after falling into well during construction | बांधकाम करताना विहिरीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

बांधकाम करताना विहिरीत पडल्याने कामगाराचा मृत्यू

तुरंबे :

कपिलेश्वर (ता. राधानगरी) येथे विहिरीचे बांधकाम करत असताना दशरथ ज्ञानदेव तोरस्कर (वय ४२) या बांधकाम कामगाराचा पाय घसरल्याने तोल जाऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. कपिलेश्वर येथे दहीभात नावाच्या शेतात विहीर बांधकाम सुरू आहे. यासाठी कामगार काम करत असताना दशरथ तोरस्कर यांचा पाय घसरुन विहिरीत तोल गेला. बघता बघता त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांना अपयश आले. बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे नेण्यात आले; परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राधानगरी पोलीस ठाण्याचे एस. बी. पारखे, ए. ए. गुरव यांनी पंचनामा केला, तर डॉ. पी. आर. भोकरे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. दशरथ तोरस्कर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

फोटो

१८ दशरथ तोरस्कर

Web Title: Worker dies after falling into well during construction