संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘दक्षिण काशी’ म्हणून नावलौकिक असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्रीक्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत दर्शनमंडपाचे काम सुरू केले आहे. मात्र यासाठी मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेली प्राचीन तटबंदी तसेच ओवऱ्या पाडण्याचे काम चालू आहे. प्राचीन तटबंदी पाडण्याला हेरिटेज समितीने मात्र कोणताच आक्षेप न घेतल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसांपासून या कामासाठी जोतिबा मंदिराच्या आवारातील पश्चिम बाजूची तटबंदी हटविण्यात आली आहे. याशिवाय हत्ती बांधण्याची जागा, ओवरीवरील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे कार्यालय, तसेच कार्यालयाजवळील जुना पायरी मार्ग, तसेच चोपडाई (बाव) तीर्थकुंडाजवळील तटबंदी, जुना भुयारी मार्ग, आदी ठिकाणे हटविण्याचे काम सुरू आहे. या तटबंदीच्या शेजारीच प्राचीन तीर्थकुंडेही आहेत. तटबंदी आणि ओवºया पाडल्यामुळे काही भुयारी मार्गही दृष्टिपथात येत आहेत.असा असणार दर्शन मंडपभाविकांना जोतिबाचे सुलभतेने दर्शन घेता यावे; यासाठी देवस्थान समिती २५ कोटींच्या निधीतील आठ कोटींतून १0५00 चौरस फूट क्षेत्रांवर तीन मजली दर्शन मंडपाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मजल्यावर हॉल तसेच पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांचा समावेश आहे. नियोजित स्वच्छतागृहांच्या प्रकल्पामध्ये पुरुषांसाठी ३६ बाथरुम व २४ स्वच्छतागृहे, तर महिलांसाठी ३६ बाथरुम व २४ स्वच्छतागृहे, बेसीन, लॉकर्स, वेटिंग रुम, सोलर तसेच वॉच टॉवर अशा सुविधा आणणार आहेत. जाधव कन्स्ट्रक्शनकडे हे काम आहे.तटबंदीचे दगड खासजोतिबा मंदिराचा दगड मंदिरातील तापमान संतुलित राखण्याचे काम करतो; त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये गाभाºयाबरोबरच मंदिराबाहेर व मंडपात भाविकांना गारव्याचा अनुभव घेता येतो. आता तटबंदीचे दगडच पाडल्यामुळे हे दगड पुन्हा वापरणार काय? असा प्रश्न आहे.जोतिबाचे मंदिर प्राचीनश्री जोतिबाचे आज जे मोठे मंदिर दिसते आहे, ते इ. स. १७३० मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्रचित करून बांधले. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रतीच्या वेसाल्ट दगडातील आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मूळ मंदिर प्राचीन असून, उर्वरित दोन मंदिरे ही अठराव्या शतकात बांधल्याचा उल्लेख आढळतो.
जोतिबावरील दर्शनमंडपाचे काम सुरू; प्राचीन तटबंदी पाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:16 IST