कोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 18:22 IST2020-01-08T18:19:59+5:302020-01-08T18:22:25+5:30

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर ...

Work stops at Government Offices in Kolhapur | कोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्प

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला. छाया-आदित्य वेल्हाळ

ठळक मुद्देकोल्हापुरात शासकीय कार्यालयांतील कामकाज ठप्पबँका बंद राहिल्याने कोटींचे व्यवहार ठप्प

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शासकीय सर्व कार्यालये बंद राहिली तर बँका बंद राहिल्याने कोटी रूपयांचे व्यवहार ठप्प झाले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर तर इतर कर्मचाऱ्यांनी बिंदू चौकापर्यंत मोर्चा काढला. ४५00 माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद राहिल्या तर ३२ हजार शासकीय व निमशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले. जुनी पेन्शन लागू करण्यासह इतर मागण्यांचा पुनरूच्चार यावेळी करण्यात आला.

शहरातील टाऊन हॉल परिसरामध्ये सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व संघटनांचे आंदोलक जमले. तेथे संपामागची भूमिका सांगितली गेली. त्यानंतर घोषणा देत निघालेल्या मोर्चाची सांगता बिंदू चौकामध्ये झाली. दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून निदर्शने केली.
 

 

Web Title: Work stops at Government Offices in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.