वैद्यकीय क्षेत्रात यशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST2021-02-05T07:08:08+5:302021-02-05T07:08:08+5:30
कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्र हे सतत विस्तारत जाणारे व नवनव्या बदलांना सामोरे जाणारे क्षेत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत ...

वैद्यकीय क्षेत्रात यशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे
कसबा बावडा : वैद्यकीय क्षेत्र हे सतत विस्तारत जाणारे व नवनव्या बदलांना सामोरे जाणारे क्षेत्र असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत अपडेट राहण्याची गरज आहे. या क्षेत्रात यशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे मानून त्या ध्येयाने प्रेरित व्हा, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना केले.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी शासन निर्देशानुसार सहा महिने उशिराने एमबीबीएस प्रथमवर्ष वर्ग सुरू झाले आहेत. या नव्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे मंगळवारी स्वागत करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वसुधा निकम आदी उपस्थित होते.
यावर्षी देशातील २० राज्यांमधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, मणिपूर, केरळ, प. बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, ओडीशा, राजस्थान, दमण, झारखंड, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाला उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सुरेश खोपडे उपस्थित होते.
फोटो: ०३ डीवाय पाटील
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल.