शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: भूसंपादन न करताच बालिंगा-दाजीपूर राज्य मार्गाचे काम, ग्रामस्थांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:42 IST

शेतीचे नुकसान

म्हालसवडे : कोल्हापुरातून फोंडाघाटमार्गे कोकणाला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खासगी कंपनीकडून काम सुरू असून अनधिकृतरीत्या शेत व पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. घानवडे (ता. करवीर) परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भूसंपादन करून मोबदला द्या, अशी मागणी केली आहे. हा रस्ता २५३ कोटींचा आहे.बालिंगा ते दाजीपूर या नवीन राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी उभ्या पिकांसहित शेतजमिनी खोदण्यात येत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. घानवडेतील शेतकऱ्यांना बांधकाम विभागाकडून बालिंगा ते दाजीपूर जिल्हा मार्ग नोंद असून, या ठिकाणी राज्य महामार्गाची कागदपत्रे अस्तित्वात नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, खासगी कंपनीकडून अनिधिकृतरीत्या पिकांचे नुकसान करून खोदकाम सुरू असल्याचा आरोप घानवडे परिसरातील नागरिकांनी केला आहे. निवेदनात, रुंदीकरणांमध्ये येणाऱ्या शेतीला कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान अद्याप मिळालेले नाही. राज्य महामार्गाच्या रुंदीकरणात शेती देण्यास हरकती नाहीत. मात्र, भूसंपादन करून शासन नियमाप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. यावेळी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, परसू पाटील, बाजीराव जाधव, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.

विकास कामासाठी रस्त्याच्या कामाला अडचण निर्माण करणार नाही. मात्र, रस्त्याकाठच्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या व लाखमोलाच्या जमिनी रुंदीकरणामुळे जात आहेत. शासन नियमाप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती, पं. स. करवीरकोणतीही पूर्वकल्पना न देता आमच्या शेतातून रस्ता करण्यात येत आहे. रस्ता करण्यास आमचा विरोध नाही. आम्हाला जमिनीचा मोबदला मिळावा. -सुनील पाटील, ग्रामस्थ, घानवडे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकkonkanकोकण