शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

Kolhapur: ‘केशवराव’चे काम जलदगतीने; पण क्रांतिदिनाचा मुहुर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 18:41 IST

जोरदार पावसामुळे कामात व्यत्यय; तिसऱ्या टप्प्यातील कामाची वर्क ऑर्डर लवकरच

कोल्हापूर : कोल्हापूरच्या नाट्यचळवळीचा मूकनायक असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागून गुरुवारी एक वर्ष पूर्ण होईल. आगीत भस्मसात झालेले नाट्यगृह एक वर्षात ‘जसेच्या तसे’ उभारण्याचा संकल्प महापालिका प्रशासन, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, कलाप्रेमी यांनी केला. काही तांत्रिक अडचणी तसेच पावसाचा जोरदार सामना करत, नाट्यगृह उभारण्याची प्रक्रिया गतीने सुरू असली तरी, क्रांतिदिनी याच नाट्यगृहात नाट्यप्रयोग करण्याचा मुहूर्त मात्र अपूर्ण कामामुळे हुकणार आहे.महाराष्ट्राच्या नाट्य तसेच चित्रपट क्षेत्राला अनेक दिग्गज अभिनेते देणाऱ्या नाट्यगृहाला ८ ऑगस्टच्या रात्री लागलेल्या भीषण आगीनंतरचे भयाण दृश्य पाहून अवघी करवीरनगरी हळहळली होती. अनेक कलाकारांना त्यांच्या भावनांना आवर घालता आला नाही. त्यांना ओक्साबोक्सी रडताना पाहून अनेकांच्या मनाची कालवाकालव झाली होती. त्यानंतर मात्र सर्वांनीच मनावर घेतले आणि सर्वांच्या सहकार्यातून नाट्यगृहाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली.दि. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी कोणत्याही परिस्थितीत राखेतून नव्याने उभारणाऱ्या नाट्यगृहात दिमाखदार नाट्यप्रयोग करण्याचा चंग बांधला गेला. प्रत्येकजण कामाला लागले. राज्य सरकारने तत्काळ २५ कोटींचा निधी दिला; प्रत्येक कामात रेंगाळणाऱ्या महापालिका प्रशासनाने कामाची गती वाढवून शॉर्ट टेंडर काढून कामाला सुरुवात केली. सर्व शासकीय, महापालिका यंत्रणा, हेरिटेज कमिटी, कलाकार, लोकप्रतिनिधी अशा विविध घटकांना एकत्र बसवून नाट्यगृहाचे डिझाइन निश्चित करण्यात आले. त्यामुळे कसल्याही शंका-कुशंकांना वाव राहिला नाही. या प्रक्रियेत खासदार शाहू छत्रपती यांनी निभावलेली भूमिका महत्त्वाची होती.नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात होऊन केवळ दहा महिनेच झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील भिंती मजबूत करणे, कौले घालणे, वॉटरप्रुफिंग, आदी छताचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील नाट्यगृहाच्या मागील स्टेज, फुटिंग, कलादालन, मेकअपरूम, ग्रीनरूम, कॉलम टाकून वीट बांधकाम यांचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या इंटेरिअर, विद्युतीकरण, ॲकोस्टिक, वातानुकूलित यंत्रणा, फायर फाइटिंग यांसारखी कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे.इतिहासात प्रथमच गतीने काम‘महापालिकेचे काम म्हणजे सहा महिने थांब,’ अशी रीत झाली आहे. अनेक कामे वर्षानुवर्षे रेंगाळली आहेत; परंतु नाट्यगृहाचे कामाची प्रक्रिया झपाट्याने पूर्ण होऊन कामेही गतीने होऊ लागली आहेत. १५ मेपासून पाऊस सुरू झाला; त्यामुळे कामात अडचणी आल्या, नाही तर काम आणखी पुढे गेले असते. पालिकेच्या इतिहासात विक्रमी गती घेणारे हे पहिलेच काम आहे.

चार महिन्यांत नाट्यगृहाचे काम पूर्णनाट्यगृहाच्या कामाची गती पाहता संपूर्ण नाट्यगृहाचे काम पूर्ण होण्यास किमान चार ते पाच महिने लागतील, असे या कामावरील नियंत्रण अधिकारी सहायक अभियंता मिलिंद पाटील यांनी सांगितले.

ठळक बाबी

  • पहिला टप्पा कामाचे ठेकेदार - लक्ष्मी हेरिकॉन प्रा. लि., मुंबईकामाची किंमत - ७ कोटी ९५ लाख
  • दुसऱ्या टप्पा कामाचे ठेकेदार - व्ही. के. पाटील ॲन्ड सन्स कामाची किंमत - कोटी २२ लाख
  • तिसऱ्या टप्पाचे ठेकेदार ठरायचे आहेत.कामाची किंमत ११ कोटी ७७ लाखकामाचे सल्लागार - स्ट्रक्टवेल, कन्सल्टन्सी प्रा. लि.