नागणवाडी बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:39+5:302021-02-16T04:24:39+5:30

पांगिरे : नागणवाडी (दिंडेवाडी) बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून ...

Work on Naganwadi Barve project started at a fast pace | नागणवाडी बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू

नागणवाडी बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू

पांगिरे : नागणवाडी (दिंडेवाडी) बारवे प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून या प्रकल्पामुळे दिंडेवाडीसह परिसराचा कायापालट होणार आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. हा प्रकल्प परिसराला वरदायिनी ठरणार आहे. तसेच दिंडेवाडीच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिर आणि रस्ता प्रारंभ कार्यक्रमात आबिटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच श्रीधर भोईटे होते.

शासनाच्या २५ : १५ योजनेअंतर्गत रस्ता व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. मोफत आरोग्य शिबिरामध्ये गावातील सुमारे २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत दिंडेवाडी यांच्यावतीने भुदरगड तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सरपंच श्रीधर भोईटे, राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा. शिक्षक संजय गुरव, किसान युवा क्रांती उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कपिल गुरव यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रा. डाॅ. शहाजीराव‌‌ वारके, प्राचार्य मिलिंद पांगीरेकर, बाजीराव चव्हाण, डी. के. परीट, विद्याधर परीट, सुनील किरोळकर, मोहन पाटील, सागर मिसाळ, योगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भिकाजी मगदूम, गणेश मोरबाळे, सारिका देशपांडे, शोभा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन किरण देशपांडे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ शहाजीराव वारके सर यांनी केले. आभार शशिकांत फराकटे यांनी मानले.

--

फोटो ओळ

दिंडेवाडी येथे रस्ता प्रारंभ करताना आमदार प्रकाश आबिटकर, सरपंच श्रीधर भोईटे, बाजीराव चव्हाण, मिलिंद पांगिरेकर आदी.

Web Title: Work on Naganwadi Barve project started at a fast pace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.