कल्लोळ येथील कालिकानंदतीर्थ स्वामी समाधीस्थळाचे काम वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:30+5:302021-05-07T04:25:30+5:30

कोल्हापूर : कल्लोळ (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे प. प. कालिकानंदतीर्थ स्वामी समाधीस्थळाचे काम गतीने सुरू आहे. गेल्याच ...

Work on the Kalikananda Tirtha Swami Samadhisthala at Kallol is in full swing | कल्लोळ येथील कालिकानंदतीर्थ स्वामी समाधीस्थळाचे काम वेगात

कल्लोळ येथील कालिकानंदतीर्थ स्वामी समाधीस्थळाचे काम वेगात

कोल्हापूर : कल्लोळ (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथे प. प. कालिकानंदतीर्थ स्वामी समाधीस्थळाचे काम गतीने सुरू आहे. गेल्याच महिन्यात त्याचे भूमिपूजन झाले होते. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे, पण सध्या आर्थिक अडचणी येत असल्याने भक्तांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प. प. कालिकानंदतीर्थ स्वामी सिद्धयोग न्यासच्यावतीने हे बांधकाम सुरू आहे. न्यासच्या विश्वस्त मयुरी देसाई यांनी सांगितले की, पावसाळ्यात येथे नदीचे पाणी येते. त्यादृष्टीने समाधीस्थळ सुरक्षित करण्यासाठी बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. येथे समाधीस्थळाबरोबरच ध्यानमंदिर, भक्तनिवास अशा विविध सुविधा भक्तांसाठी उभारण्यात येणार आहेत. या अनुषंगाने यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी गरजेचा आहे. यासाठी भक्तांनी आपापल्यापरिने आर्थिक मदतीसाठी न्यासाच्या विश्वस्तांशी संपर्क साधावा, असे आवाहनही देसाई यांनी यावेळी केले.

Web Title: Work on the Kalikananda Tirtha Swami Samadhisthala at Kallol is in full swing