शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: Kagal-Satara six laning: महामार्गाचे काम सुरु, पूर्ण करण्याची कसोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:47 IST

अनेक महिन्यांपासून काम होते ठप्प 

सतीश पाटीलशिरोली : कागल-सातारा सहापदरीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला, तरी विविध कारणांमुळे हे काम रखडले होते. यातील काही कामे दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती; मात्र ती अर्धवट अवस्थेतच बंद पडली होती. दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता या रखडलेल्या कामांना पुन्हा मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यातील कागल ते पेठ नाकादरम्यानचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३५ टक्के काम ३० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे रोडवे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे उद्दिष्टे आहे. मात्र, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनीला मोठी कसरत करावी लागणार आहे.शिरोली-सांगली फाटा, एचएमटी फाटा, एमआयडीसी अंबप, मंगरायाचीवाडी, तसेच घुणकी या परिसरातील बंद असलेल्या रस्त्याच्या कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. कागल बस डेपो, के.आय.टी. उजळाईवाडी, नागाव फाटा येथील उड्डाणपुलांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. हे उड्डाणपूल पूर्ण झाल्यास कागल, शिरोली, उजळाईवाडी आणि कोल्हापूर शहराच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

विशेषतः औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या जड वाहनांसाठी ही सहापदरी मार्गिका महत्त्वाची ठरणार आहे. काही महत्त्वाची आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड कामे अजूनही प्रलंबित असून, ती वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरणार आहे. विशेषतः टोप येथील सुमारे ३५० मीटर लांबीच्या फ्लायओव्हरचे काम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.यासोबतच वारणा नदीवरील ब्रिज, लक्ष्मी टेकडी परिसर, तसेच कणेरी वाडी येथील कामेही जोखमीची आणि तांत्रिकदृष्ट्या अवघड आहेत. या ठिकाणी भौगोलिक रचना, वाहतुकीची सततची वर्दळ होत आहे. त्यामुळे ही सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.३० जून २०२६ ही या कामाची अंतिम मुदत देण्यात आली असून, त्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी रोडवे कंपनीवर आहे. यासाठी कंपनीकडून अतिरिक्त यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळ आणि कामाचे टप्पे वाढवण्याची गरज भासणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनाकागल–सातारा सहापदरीकरण महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी १७ डिसेंबर रोजी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या अपूर्ण व बंद असलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.नव्या कामाची निविदासांगली फाटा ते उचगाव साडेतीन किलोमीटरचा फ्लाय ओव्हर आणि बास्केटब्रीज, तसेच कागल येथील फ्लाय ओव्हर, या कामाची निविदा १ जानेवारी २०२६ पर्यंत भरावयाची आहे. आणि जानेवारीअखेरपर्यंत हे काम कुणाला मिळाले हे कळेल.

तांत्रिक अडचणींमुळे काम बंद होते, पण आता शिरोली सांगली फाटा, एचएमटी फाटा, एमआयडीसी, अंबप, या ठिकाणी बंद असलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच, कागल बस डेपो के. आय. टी. उजळाईवाडी नागाव फाटा येथील उड्डाणपुलांच्या कामालाही सुरुवात झाली आहे. - महादेव चौगुले, प्रकल्प अधिकारी, रोडवे इन्फ्रास्ट्रक्चर.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Satara Six-Lane Highway: Work Resumes, Completion a Challenge

Web Summary : Kolhapur-Satara highway six-laning restarts after delays. 65% of Kagal-Peth Naka section is complete. The June 2026 deadline requires significant effort due to pending complex tasks including flyovers and bridge construction. District Collector inspected progress, urging acceleration. New flyover tenders are due January 2026.