वाढत्या संसर्गातही कोरोना योद्धांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:24 IST2021-05-07T04:24:41+5:302021-05-07T04:24:41+5:30
आजरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीतही स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना योद्धयांचे हे ...

वाढत्या संसर्गातही कोरोना योद्धांचे कार्य कौतुकास्पद
आजरा :
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीतही स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना योद्धे रुग्णसेवा करीत आहेत. कोरोना योद्धयांचे हे काम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले. ते आजरा येथील कोरोना कोविड सेंटर भेटीवेळी बोलत होते.
घाटगे म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. शाहू साखर कारखान्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना व त्यांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, तहसीलदार विकास अहिर आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : आजऱ्यातील कोविड सेंटर भेटीवेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना समरजित घाटगे. शेजारी अशोक चराटी, विकास अहिर, डॉ. यशवंत सोनवणे आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०६०५२०२१-गड-०६