The wonderful story of happiness in nature is 'Jungle treasure research' | निसर्गातील आनंदाची विलक्षण कथा म्हणजे ‘जंगल खजिन्याचा शोध’
निसर्गातील आनंदाची विलक्षण कथा म्हणजे ‘जंगल खजिन्याचा शोध’

डॉ. प्रकाश मुंज 

कोल्हापूर : ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा असल्याची प्रतिक्रिया बाल साहित्यकार सलीम सरदार मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

मराठी भाषेतील ‘बाल साहित्य पुरस्कार’ तळंदगे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीस साहित्य अकादमीतर्फे २०१९चा ‘बाल साहित्य पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर झाला. पुण्यातील दर्या प्रकाशनाने २०१४ मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली. जेबू आणि त्याचे छोटे मित्र डोंगर-कपारीतून मनसोक्त भटकतात. पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर प्राणी, कीटक, झाडे-वनस्पती, पाना-फुलांचा गंध, त्यांचे औषधी उपयोग, दगड-मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे जंगलच्या आगळ्यावेगळ्या खजिन्याची छोट्यांना ओळख होत जाते आणि यातून मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाºया टोळीचा पर्दाफाश होतो. लहान मुलांच्या दृष्टीने कादंबरी उत्कंठावर्धक आणि वाचनीय ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.

सलीम मुल्ला २००६पासून कडगाव (ता. भुदरगड) येथे वनरक्षक आहेत. १९८८पासून सातत्याने वन्यप्राणी, वन्यपक्षी, निसर्गविषयक विविध पत्रिकांसह ‘लोकमत’मध्येही ते लेखन करत आहेत.

निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून हरेक ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. पाखरांच्या कलकलाटाची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. किडे, फुलपाखरे, पशु-पक्षी या साऱ्यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचे नेमके प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येते. - सलीम मुल्ला, साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते

दोन कांदबºया प्रकाशनाच्या मार्गावर : पेणा आणि चिकोटी व अजबाईतून उतराई या त्यांच्या दोन बालकादंबºया प्रकाशनाच्या मार्गावर आहे.


Web Title: The wonderful story of happiness in nature is 'Jungle treasure research'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.