मुदाळ येथे महिला मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:57+5:302021-01-17T04:22:57+5:30
सरवडे : मुदाळ (ता.भुदरगड) येथील के. पी.पाटील फौंडेशनच्या वतीने हळदी-कुंकू सभारंभ व महिला मेळावा अंबाबाई देवालय येथे ...

मुदाळ येथे महिला मेळावा संपन्न
सरवडे : मुदाळ (ता.भुदरगड) येथील के. पी.पाटील फौंडेशनच्या वतीने हळदी-कुंकू सभारंभ व महिला मेळावा अंबाबाई देवालय येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच परिषद महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा राणी पाटील होत्या. अध्यक्षस्थानी माजी सरपंच मायादेवी कृष्णराव पाटील होत्या.
यावेळी पाटील यांनी आपल्या भाषणात महिलांनी आपले आरोग्य, उपजीविका व आंनदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन राजनंदिनी विकासराव पाटील यांनी केले होते.
यावेळी मुदाळ गावचे सरपंच शितल माने, उपसरपंच उज्ज्वला पाटील, बचत गटाच्या सर्व प्रमुख महिला व गावातील असंख्य महिला युवती उपस्थित होत्या. राजनंदिनी पाटील यांनी स्वागत व आभार मानले.
फोटो १)मुदाळ (ता. भुदरगड) येथे के. पी. पाटील फौंडेशनच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना राणी पाटील व समोर उपस्थित महिला. २) मुदाळ (ता. भुदरगड) येथे के. पी. पाटील फौंडेशनच्यावतीने आयोजित महिला मेळाव्यात सरपंच परिषदेच्या अध्यक्षा राणी पाटील यांचा सत्कार करताना सरपंच शितल माने, राजनंदिनी पाटील व इतर.