महिलांच्या विकासाच्या योजना प्रभावी राबवल्या : मनीषा माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:29+5:302021-04-16T04:24:29+5:30

नवे पारगाव : भादोले जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंबप परिसरातील महिलांच्या विकासाच्या योजना प्रभावीपणे ...

Women's development schemes implemented effectively: Manisha Mane | महिलांच्या विकासाच्या योजना प्रभावी राबवल्या : मनीषा माने

महिलांच्या विकासाच्या योजना प्रभावी राबवल्या : मनीषा माने

नवे पारगाव : भादोले जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंबप परिसरातील महिलांच्या विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांनी केले.

अंबप (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत सभागृहात एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बेबी केअर कीट वाटपप्रसंगी मनीषा माने बोलत होत्या.

जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण अंतर्गत अंबप गटात बेबी केअर किटचे वाटप जि. प. सदस्या मनीषा माने यांच्या हस्ते झाले. माहिती शिक्षण संप्रेषण कार्यक्रमात राजेंद्र हायस्कूलमध्ये डॉ. भाग्यश्री मोहिते यांनी गरोदर माता व किशोरवयीन मुलींना आहाराबाबत मार्गदर्शन केले.

राजेंद्र हायस्कूलमध्ये डॉ. संदीप मोहिते, मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, प्रभारी पर्यवेक्षक विद्यादेवी लोहार, अंगणवाडी पर्यवेक्षिका शुभांगी बुवा, राजयोगिनी डंबे यांची भाषणे झाली. जयश्री बोरगावकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी : अंबप (ता. हातकणंगले) येथे एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बेबी केअर किटचे वाटप करताना जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने. सोबत अंगणवाडी पर्यवेक्षक शुभांगी बुवा.

Web Title: Women's development schemes implemented effectively: Manisha Mane