शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day 2018 : एस.टी.ची ‘महिला दिना’ची भेट ; पश्चिम महाराष्ट्रात ‘लेडीज स्पेशल’!, पहिलाच उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:46 IST

राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे.

ठळक मुद्देएस.टी.ची ‘महिला दिना’ची भेट पश्चिम महाराष्ट्रात ‘लेडीज स्पेशल’!फक्त महिला प्रवाशांसाठी विशेष बस ८ मार्चपासून धावणार

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिला प्रवाशांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे.आजच्या काळात स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक अशा अनेक रूपांनी वावरते. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांसोबत आहे.

अनेक महिला आज कामानिमित्त कोल्हापूर ते सांगली व सांगली ते कोल्हापूर असा दैनंदिन प्रवास करतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या  महिलांची संख्या जास्त आहे. मुंबईतील महिलांसाठी असलेल्या लोकल ट्रेनप्रमाणेच महिला प्रवाशांसाठी कोल्हापूर व सांगली विभागांच्या वतीने ‘लेडीज स्पेशल’ विशेष एस. टी. बससेवा सुरू करण्यात येत आहे.दैनंदिन संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी घर, संसार, मुलांबाळाचे संगोपन करून दररोज कामानिमित्त जाताना एस. टी.मधून प्रवास करताना महिलांना जागा न मिळणे, गाडीतील गर्दी यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, खास महिलांसाठीच या विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिला दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर व सांगली विभागाच्या वतीने ‘फक्त महिलांसाठी’च या गाड्या सुरू करण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे.शैलेंद्र चव्हाण,विभाग नियंत्रक

 

  1. - कोल्हापूर व सांगली विभागांतर्फे नियोजन
  2. - सकाळी व सायंकाळी दोन सत्रांत
  3. - महिलांची गैरसोय टळणार. 

महिलाच वाहक‘लेडीज स्पेशल’ एस.टी. बसमध्ये वाहक म्हणून महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना कोणत्याही गैरसोईला सामोरे जावे लागणार नाही. तसेच महिला प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य काही मार्गांवरही गाड्या सोडण्यात येणार आहेत.

यावेळी सुटणार गाडी

  1. कोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वा.
  2. सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. व सायंकाळी ५.४५ वा.

 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८kolhapurकोल्हापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ