शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यात गोळ्या घालण्याची हिम्मत, अजूनही गोळ्या घालू शकते; बडतर्फ महिला पोलिसाची तुरुंगाधिकाऱ्यास धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:03 IST

कोल्हापुरातील मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारनजीक ही घटना घडली. 

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहातील वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यास बडतर्फ महिला पोलीस उज्जला झेंडे यांनी गोळ्या घालण्याची धमकी दिली. त्याबाबतची तक्रार तुरुंगाधिकारी मीरा विजय बाबर यांनी काल, रविवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार झेंडे याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी मध्यवर्ती कारागृहाच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारनजीक घडली. याबाबत माहिती अशी की, बडतर्फ पोलीस कर्मचारी उज्जला झेंडे यांचा मुलगा एका प्रकरणात सद्या कळंबा कारागृहात आहे. त्या मुलाकडे कारागृहात तुरुंगाधिकारी बाबर यांनी काही माहिती विचारली होती. त्याबाबत मुलाने आपली आई उज्जला झेंडे यांना निरोप दिला. त्यानुसार झेंडे ह्या शनिवारी दुपारी एका सहकार्यासह कारागृहानजीक आल्या होत्या. त्यांनी तुरुंगाधिकारी बाबर यांना बाहेर बोलवले. त्यांनी, ‘माझ्या मुलाकडे गोळी कोणी मारली असे तुम्ही का विचारले’ असा जाब विचारत बाबर यांच्याशी वाद घातला. माझ्यात गोळ्या घालण्याची हिम्मत होती, म्हणून गोळ्या घातल्या. अजूनही मी गोळ्या घालू शकते, अशी धमकीही तीने दिली. त्यावेळी तुरुंगाधिकारी बाबर यांनी झेंडे व तिच्यासोबत आलेल्या सहकारीस तेथून हटकले. त्यावेळी झेंडे हिने त्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुंगाधिकारी बाबर यांनी झेंडे व बंगे या दोघांवर गैरवर्तन केल्याबाबती तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरjailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस