विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: June 5, 2014 01:37 IST2014-06-05T01:00:50+5:302014-06-05T01:37:47+5:30

उपचारापूर्वीच मृत्यू

Woman's death by electric shocks | विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

 कळे : कळे (ता. पन्हाळा) येथील साताबाई सीताराम कांबळे (वय ४०) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सौ. कांबळे या आज, बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान नळाला पाणी आल्याने घरगुती विद्युतमोटार जोडत होत्या. त्यावेळी विद्युत प्रवाहित वायर हातात घेतल्याने त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी कळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तथापि, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सासू-सासरे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ८) आहे. (वार्ताहर)

Web Title: Woman's death by electric shocks