शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

ट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 6:39 PM

मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठारमार्केट यार्डासमोरील घटना : कामावर जाताना नियतीचा घाला

कोल्हापूर : मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.पोलिसांनी सांगितले, अंकिता पोवार यांचे पती शिरोली एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करीत होते. ते दारूच्या आहारी गेल्याने नोकरी सोडून घरीच असतात. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुलगी नववीमध्ये शिकते. त्यामुळे घरची जबाबदारी आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी अंकिता पोवार या मार्केट यार्ड येथील एका कंपनीत नोकरी करीत होत्या.

नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी बसने मार्केट यार्ड बसस्थानक येथे उतरल्या. रस्ता ओलांडून मार्केट यार्ड कमानीसमोरून जात असताना प्रवेशद्वारासमोर त्यांना ट्रक (एम एच ०९ बी सी ४७००) ने धडक दिली. त्यामध्ये रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

येथील नागरिकांनी बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच बुधवार पेठ येथील नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. दोन्ही मुलांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. 

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर