ट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 06:39 PM2020-03-03T18:39:10+5:302020-03-03T18:45:38+5:30

मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.

The woman killed in a truck collision Wednesday | ट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठार

ट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठार

googlenewsNext
ठळक मुद्देट्रकच्या धडकेत बुधवार पेठेतील महिला ठारमार्केट यार्डासमोरील घटना : कामावर जाताना नियतीचा घाला

कोल्हापूर : मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुजावर (रा. माळी कॉलनी, टाकाळा) याला अटक केली.

पोलिसांनी सांगितले, अंकिता पोवार यांचे पती शिरोली एमआयडीसीमध्ये खासगी नोकरी करीत होते. ते दारूच्या आहारी गेल्याने नोकरी सोडून घरीच असतात. या दोघांना दोन मुले आहेत. मुलगा विज्ञान शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. मुलगी नववीमध्ये शिकते. त्यामुळे घरची जबाबदारी आणि उदरनिर्वाह चालविण्यासाठी अंकिता पोवार या मार्केट यार्ड येथील एका कंपनीत नोकरी करीत होत्या.

नेहमीप्रमाणे त्या मंगळवारी सकाळी बसने मार्केट यार्ड बसस्थानक येथे उतरल्या. रस्ता ओलांडून मार्केट यार्ड कमानीसमोरून जात असताना प्रवेशद्वारासमोर त्यांना ट्रक (एम एच ०९ बी सी ४७००) ने धडक दिली. त्यामध्ये रस्त्यावर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

येथील नागरिकांनी बेशुद्धावस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या अपघाताचे वृत्त समजताच बुधवार पेठ येथील नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. दोन्ही मुलांचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.
 

 

Web Title: The woman killed in a truck collision Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.