कोथळी येथे मारहाणीत महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:22 IST2021-03-22T04:22:51+5:302021-03-22T04:22:51+5:30

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोथळी येथे ट्रॅक्टर रस्त्यावर पार्क करण्याच्या कारणावरून वादावादीचा प्रकार घडला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिला गंभीर ...

Woman injured in beating at Kothali | कोथळी येथे मारहाणीत महिला जखमी

कोथळी येथे मारहाणीत महिला जखमी

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कोथळी येथे ट्रॅक्टर रस्त्यावर पार्क करण्याच्या कारणावरून वादावादीचा प्रकार घडला. यावेळी झालेल्या हाणामारीत महिला गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. रंजना बाळू पाटील (वय ५५, रा. कोथळी) असे जखमीचे नाव असून करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे अशी : नामदेव दत्तू पाटील, सुभाष नामदेव पाटील, शुभांगी अशोक पाटील, सारिका सुभाष पाटील (सर्व रा. कोथळी).

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नामदेव पाटील यांचा ट्रॅक्टर हा रंजना पाटील यांच्या जनावराच्या गोठ्यानजीक रस्त्यावर लावला होता. या कारणास्तव दोन्ही गटात वादावादी झाली. यावेळी संशयितांनी अनिल पाटील याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यांची आई रंजना पाटील ह्या वाद सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना संशयितांनी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन चौघा संशयितांवर गुन्हा नोंदवला आहे.

Web Title: Woman injured in beating at Kothali