शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: हातकणंगलेतील महिलेचा अनैतिक संबंधातून खून; अवघ्या काही तासात आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:36 IST

रूपालीच्या मोबाइल डिटेल्सवरून पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतला

हातकणंगले : हातकणंगले येथे तीन दिवसांपूर्वी भाड्याच्या घरात राहायला आलेल्या रूपाली दादासो गावडे (वय २८, रा. हिंगणगाव, ता. हातकणंगले) हिचा अनैतिक संबंधातून मंगळवारी सकाळी तिच्या प्रियकराने दोरीने गळा आवळून खून केला. या खुनातील फरार संशयित आरोपी प्रकाश शेखर हदिमणी (वय ३५, रा. हिंगणगाव) यास अवघ्या आठ तासात एलसीबीच्या पथकाने अटक केली. खूनप्रकरणी हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मी औद्योगिक वसाहत रोडला राजदीप खोत यांच्या मालकीच्या भाड्याच्या खोलीत प्रकाश हदिमणी आणि रूपाली गावडे तीन दिवसांपूर्वी राहायला आले होते. रूपाली आणि प्रकाश यांचे प्रेमसंबंध होते. ते दोन-तीन वर्षे हिंगणगाव सोडून बाहेर राहात होते. दोघेही विवाहित आहेत. रूपाली हिचा घटस्फोट झाला असून, तिला दोन मुले आहेत. तिचे माहेर बागणी (ता. वाळवा) आहे. ती प्रकाशसोबत गेली तीन वर्षे राहात होती. दोघेही लक्ष्मी औद्योगिक वसाहत येथे काम करत होते. प्रकाशला दारूचे व्यसन होते. या कारणाने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.मंगळवारी सकाळी दोघांमध्ये भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या रागातून प्रकाशने रूपालीचा गळा दोरीने आवळून खून केला. माहिती मिळाल्यानंतर हातकणंगले पोलिस ठाण्याचे पो. हे. कॉ. महादेव खेडकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रूपालीच्या मोबाइल डिटेल्सवरून पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला होता.एलसीबीच्या पथकाने अवघ्या आठ तासात संशयित प्रकाश हदिमणी यास हातकणंगले -पेठ वडगाव रस्त्यावरील आळते परिसरातून ताब्यात घेतले. खुनाचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. पोलिस निरिक्षक अशोक सायकर तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस