सांगवडे : येथे दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकून डोक्यावर पडल्याने महिला जागीच ठार झाली. शारदा संजय मोरे (वय ४९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही दुर्घटना गुरुवारी घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सांगवडे येथील संजय मोरे पत्नी शारदा यांच्यासह दुचाकीवरून सांगवडेवाडी येथील कुडीमळा येथे नातेवाइकांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी जात होते. डोक्यावरून मानेभोवती बांधत असताना स्कार्फ मागील चाकात गुंडाळला गेल्याने शारदा या खाली कोसळल्या. त्यांना तातडीने कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले.मोरे कुटुंबीयांनी अल्पशा शेतीतून कष्टाने संसार केला. त्यांनी शेतीच्या उदरनिर्वाहातून बंगला बांधला होता. त्याची वास्तुशांती वर्षापूर्वीच झाली होती, पण अद्याप राहण्यास गेले नव्हते.
अखेर मृत्यूने गाठलेचवर्षापूर्वी नवीन बंगल्यात कपडे सुकण्यास घालताना विद्युत तारेचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागून त्या बेशुद्ध पडल्या होत्या. पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्या बऱ्या झाल्या होत्या. त्यावेळी देव बलवत्तर म्हणून त्या वाचल्या होत्या.मुलाचे लग्न बघणे राहूनच गेलेतीन मुले, त्यापैकी थोरल्या मुलीचे लग्न झाले होते, तर एका मुलाचे व मुलीचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर मुलाच्या लग्नाचे सुख बघण्याचे राहूनच गेले.नवऱ्याच्या हमालीला भाजीविक्रीने लावला हातभारपती संजय मोरे हे गुड्स यार्ड येथे हमालीचे काम करतात. शारदा या भाजीपाला विक्री व्यवसायातून संसारास हातभार लावत होत्या. तर मुलगा शीतल याने अलीकडेच स्वतःचा फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला आहे. लहान मुलगीही रोजंदारीवर पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे.