शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:41 IST

पोलिस कॉन्स्टेबलची फिर्याद, न्यायालयाच्या सूचनेनुसार कारवाई

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पूनम सुरेश काळे (वय ३०, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तीन डॉक्टरांसह मेडिकल मालकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २८) रात्री गुन्हा दाखल झाला.

पूनम यांचा २ ऑगस्ट २०२२ रोजी मृत्यू झाल्यानंतर फिर्याद दाखल होण्यास विलंब होत असल्याने त्यांचे पती पोलिस कॉन्स्टेबल सुरेश गुलाब काळे (वय ३५, रा. राजेंद्रनगर) यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार शाहूपुरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. विलास श्रीधर नाईक, डॉ. श्रद्धा विलास नाईक (दोघे रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), हृदयविकार तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आणि मेडिकल मालक रविराज विनायक मायदेव (रा. नागाळा पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.फिर्यादी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीस किडणीचा विकार झाल्याने डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. ती स्वत:हून चालत हॉस्पिटलमध्ये गेली होती. हृदयास गाठ असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला भीती घातली. डॉ. नाईक आणि डॉ. साईप्रसाद यांनी उपचारात हलगर्जीपणा केला. बंद असलेले कोल्हापूर किडणी केअर ॲन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नावे डायलेसिसचे बिल काढले. रुग्णास मुदतबाह्य औषधे दिली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

२ ऑगस्टला तिचा मृत्यू झाल्याचे सांगून मृत्यू प्रमाणपत्र दिले. त्यानंतर बिलासाठी धनादेश जमा करून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरे मृत्यू प्रमाणपत्र दिले. मृतदेहाची हेळसांड केली तसेच पोलिस ठाण्यास वर्दी दिली नाही, असा आरोप काळे यांनी फिर्यादीत केला आहे.हॉस्पिटल प्रशासनाने आरोप फेटाळलेकाळे यांनी केलेले सर्व आरोप खोटे व खोडसाळपणाचे आहेत. डॉक्टरांना त्रास देण्यासाठी त्यांनी मुद्दाम तक्रार केली आहे. पूनम काळे यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार झाले होते. याबाबतचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. योग्यवेळी पुरावे न्यायालयात हजर करू, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.