शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: देवदर्शनाला गेलेल्या गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू, पतीसह दोन मुले जखमी; आजऱ्याजवळ झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:00 IST

गडहिंग्लज : देवदर्शन करून गोव्याला परतताना कारगाडी उलटून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अजित भोसले (वय ५०) ३२०, पोर्याचा ...

गडहिंग्लज : देवदर्शन करून गोव्याला परतताना कारगाडी उलटून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अजित भोसले (वय ५०) ३२०, पोर्याचा वाडो, कामोलीम म्हापसा, गोवा असे त्यांचे नाव आहे. आजरा-बांदा महामार्गावर आजरा शहरानजीकच्या धनगरमोळा येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला.आजरा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गोव्यातील भोसले कुटुंबीय अक्कलकोट, शिर्डी येथे देवदर्शनासाठी मोटारीतून (जी.ए.०५, डी १८७५) गेले होते. देवदर्शनानंतर ते परत गोव्याला जात होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री वाटेत जेवण करून ते गोव्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी धनगरमोळा येथे पहाटेच्या सुमाराला कारचालक आशिष याचा गाडीवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे रस्त्यालगतच्या जाहिरातीच्या फलकाला धडकून गाडी उलटली.अपघातात अंकिता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती अजित, मुले आशिष व लंकेश हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजरा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

धोकादायक वळण..!आजरा ते आंबोली दरम्यान धनगरमोळानजीक इंग्रजी ''एस'' आकाराचे धोकादायक वळण आहे. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा अपघातही याच वळणावर झाला आहे. वेळोवेळी तक्रार करूनही संबंधितांनी त्याची दखल घेतलेली नाही, अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.मोठ्या आवाजामुळे..!धोकादायक वळणावरील रस्त्यालगतच्या जाहिरातीच्या होर्डिंगला धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे जाग आलेल्या परिसरातील नागरिकांनी जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात पोहचवले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूgoaगोवा