भरधाव दुचाकीवरून पडून महिलेच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:46+5:302021-03-30T04:14:46+5:30
कोल्हापूर : भरधाव दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. पूजा संतोष ...

भरधाव दुचाकीवरून पडून महिलेच मृत्यू
कोल्हापूर : भरधाव दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. पूजा संतोष माणगावे (वय २९, रा. काशीद गल्ली, कोगनोळी, ता. निपाणी, जि. बेळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संतोष माणगावे हे आपली दोन लहान मुले व पत्नीसह दुचाकीवरून कोगनोळी ते कुरुंदवाड असा प्रवास करत होते. भरधाव दुचाकी पंचतारांकित औद्योगिक वसाहतमध्ये किर्लोस्कर कंपनीजवळ आली असता, पाठीमागे बसलेल्या पूजा माणगावे यांचा दुचाकीवरून तोल जाऊन त्या खाली रस्त्यावर पडल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना तातडीने दुपारी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.