शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:50 IST

रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले.

कोल्हापूर : सीपीआरच्या अनेक इमारतींमध्ये उंदरांचा उच्छाद वाढला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाइकाच्या शुश्रूषेसाठी आलेल्या पद्मिनी सुनील लोखंडे (वय ५०, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) यांना उंदराने चावा घेतला. ही घटना सोमवारी (दि. २) पहाटे दूधगंगा इमारतीत घडली. सीपीआरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, पद्मिनी लोखंडे या नातेवाइकांच्या शुश्रूषेसाठी सीपीआरमध्ये आल्या होत्या. दूधगंगा इमारतीत रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले. रक्तस्राव वाढल्याने त्यांनी अपघात विभागात उपचार घेतले. त्यानंतर त्या गावाकडे गेल्या.सीपीआरमध्ये सध्या इमारतींचे नूतनीकरण सुरू आहे. जुन्या साहित्याची अडगळ हटवल्याने बाहेर पडलेले उंदीर लपण्यासाठी नवीन जागा शोधत आहेत. त्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये दिवसाही उंदीर फिरताना दिसताना. आता उंदराने चावा घेतल्याची घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाने उंदरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.

वैद्यकीय उपकरणांना धोकासीपीआरच्या विविध विभागांत महागडी अद्ययावत उपकरणे, संगणक, उपचाराची साधने आहेत. उंदरांकडून या उपकरणांना धोका आहे. उपकरणांचे वायरिंग कुरतडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. रुग्णांच्या जीवालाही यातून धोका निर्माण होऊ शकतो. सीपीआरमध्ये नेहमीच औषधांचा मोठा साठा असतो. उंदरांमुळे औषधांचा साठा खराब होऊ शकतो. स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तातडीने उंदरांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे काही इमारतींमध्ये उंदीर सैरावैरा धावताना दिसतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व इमारतींमध्ये पेस्टिसाइड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. - डॉ. राजेंद्र मदने - वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय