शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: फिर्याद मागे घ्या, नाहीतर खानदान पेटवणार; धमकावत गुंडांच्या टोळीचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 18:55 IST

वर्चस्ववादातून दहशत माजविण्याचा प्रयत्न, पाच जणांवर गुन्हा, एकास अटक

कोल्हापूर : पोलिस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या, नाहीतर तुमचे खानदान पेटवणार, असे धमकावत गुंडांच्या टोळीने सासने नगर येथील श्रुतिका सचिन पोतदार (वय २८) यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. हा प्रकार मंगळवारी (दि. १७) दुपारी घडला. पोतदार यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील विशाल मांगोरे (रा. पाचगाव) याला अटक केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!आयटीआयच्या मागे असलेल्या सासने नगर परिसरात तरुणांच्या दोन गटात वर्चस्व वादातून संघर्ष वाढला आहे. आठ महिन्यांपूर्वी काही तरुणांनी घरांसमोर पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवली होती. त्याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी हल्लेखोरांना अटक करून त्याच परिसरात त्यांची वरात काढली होती.त्यानंतर काही दिवस शांतता होती. अलीकडे पुन्हा टोळ्यांकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मंगळवारी दुपारी विशाल मांगोरे याच्यासह सहा ते सात जणांनी श्रुतिका पोतदार यांच्या घरावर हल्ला केला. तलवारीने खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाचे नुकसान केले. तसेच पोलिस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घ्या, नाहीतर तुमचे खानदान पेटवीन, असे धमकावले. याबाबत फिर्याद दाखल होताच पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरू केली आहे.यांच्यावर गुन्हा दाखलविशाल मांगोरे याच्यासह सिद्धेश भांदिगरे (रा. जरगनगर), अजय शेख, विराज मोहिते, आदित्य दबडे आणि अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील मांगोरे याला पोलिसांनी अटक केली. इतरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.परिसरात दहशतपोलिसांनी यापूर्वी कारवाई करूनही गुंडांच्या टोळ्यांचा उपद्रव थांबलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत बसणे, रात्री उशिरापर्यंत चौकात दंगामस्ती करणे, रस्त्यात वाढदिवस साजरा करणे, वाहनांची तोडफोड करणे, धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिसरात दहशत वाढत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Gang Attack Threatens Family, Demands Complaint Withdrawal

Web Summary : Kolhapur: A gang attacked a family in Sasane Nagar, threatening them to withdraw a police complaint filed against them, damaging property with swords. Police arrested one suspect, Vishal Mangore, and are searching for others involved.