शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Kolhapur: "सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या" 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: June 20, 2024 18:27 IST

ओबीसी जनमोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : अन्यथा विधानसभेला विरोधात मतदान

कोल्हापूर : मराठा कुणबीच्या सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या, मराठा मतांच्या बेगमीसाठी मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडून राज्यशासन असंविधानिक व ओबीसीविरोधी मागण्या मान्य करणार असेल तर ओबीसींच्या रोषाला सामोरे जावे लागेल, विधानसभा निवडणुकीत ओबीसी सत्ताधाऱ्यांविरोधी मतदान करतील असा इशारा गुरुवारी ओबीसी जनमोर्चा संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिला.तत्पूर्वी दिगंबर लोहार. सयाजी झुंजार. एकनाथ कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. यात राज्यातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करावी, महाज्योती संस्थेची जिल्हानिहाय कार्यालये तातडीने सुरू करावी, ॲड. मंगेश ससाणे, प्रा. लक्ष्मण हाके आणी नवनाथ आबा यांच्या आमरण उपोषणाची राज्य शासनाने दखल घ्यावी अशी मागणी केली.तसेच गणगोत, सगेसोयरे असे शब्द कायद्यात बसवून काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यावर लाखो हरकती आल्या आहेत. अधिसूचनेतील संदिग्धतेमुळे जात प्रमाणपत्र व जात पडताळणीचे प्रमाणपत्र देणारे अधिकारी सरसकट मराठ्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्रे देतील. राज्य सरकारने मराठा जातीसाठी स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिल्याने सगेसोयऱ्यांबाबतच्या अधिसूचनेचा अट्टाहास चुकीचा आहे. सगेसोयरे, गणगोत, सजातीय अशा संदिग्ध शब्दांचा अंतर्भाव करून ओबीसींना मूर्ख बनवले जात आहे. त्यांची दिशाभूल करत फसवणूक केली जात आहे.राज्य शासनाने जनतेची जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव केला असून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी, ओबीसी भटके विमुक्त, विशेष मागासप्रवर्ग तसेच अन्य समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच राजकीय स्थिती जाहीर करावी. महाज्योती संस्थेचे एकमेव मुख्यालय नागपूर असल्याने ते सर्वसामान्यांना गैरसोयीचे आहे. महाज्योती योजनांची माहिती सर्वच जिल्ह्यातील ओबीसींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे सारथी प्रमाणेच महाज्योती संस्थेचे सर्व जिल्ह्याच्या मुख्यालयात स्वतंत्र कार्यालय सुरू करावे अशी मागणी करत अन्यथा आपल्या सरकारला ओबीसीं, भटके विमुक्त, विषेश मागासप्रवर्गाच्या प्रचंड मोठ्या असंतोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला.

यावेळी शिवाजी माळकर. बाळासाहेब लोहार पी.ए. कुंभार, सुभाष गुरव, बाबासाहेब काशिद, सुनिल गाताडे, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, शितल मंडपे, योगेश कुंभार. पांडुरंग परीट. काशिनाथ माळी. धनाजी गुरव. डी. बी. सातार्डेकर, ज्योतिराव लोहार, रूपाली सातार्डेकर, मालती सुतार, राधा मेस्त्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन