शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन :श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 12:07 IST

पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंबेओहोळ धरणग्रस्तांविरूद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी  दिला. 

ठळक मुद्देखोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन :श्रीपतराव शिंदे आंबेओहोळप्रश्नी गडहिंग्लज प्रांतकचेरीसमोर धरणे

गडहिंग्लज :पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंबेओहोळ धरणग्रस्तांविरूद्ध दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी  दिला. आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांच्यासह ७ प्रकल्पग्रस्तांविरूद्ध पाटबंधारे अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्या निषेधार्थ येथील प्रांतकचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.कॉ. संपत देसाई म्हणाले, संघटना आणि धरणग्रस्त यांच्यात एकवाक्यता नसल्यामुळे अधिकारी गैरफायदा घेतात. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने लढायला हवे.कॉ. अशोक जाधव म्हणाले, आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची आढावा बैठक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत उचंगी व सर्फनाला प्रकल्पाचे कामही बंद ठेवले जाईल. यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जनता दलाचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, आजरा तालुकाध्यक्ष सदानंद व्हनबट्टे, कॉ. संजय तर्डेकर यांचीही भाषणे झाली. पाणी मोजायला हवं..!तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी उचंगी, आंबेओहोळ धरणात पाणी अडविण्याची घोषणा केली. परंतु, पुनर्वसनाचे प्रश्न तसेच राहिले. त्यामुळे धरणात किती पाणी साठलं आणि नेत्यांमध्ये किती पाणी आहे? हेही एकदा मोजायला हवे, असा टोलाही शिंदेनी हाणला. मंगळवारी धरणस्थळी निर्धार परिषदमंगळवारी (१५) दुपारी १२ वाजता आंबेओहोळ धरणस्थळी आंबेओहोळ, उचंगी व सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासाठी निर्धार परिषद होईल. परिषद होईपर्यंत शासनाने आंबेओहोळचे काम थांबवावे, अन्यथा धरणग्रस्त काम बंद पाडतील, असा इशारा शिंदेंनी यावेळी दिला.

 

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर