शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील राष्ट्रवादी शरद पवारांसोबत, अशोक जांभळे-मदन कारंडे गटाचा संयुक्त निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 16:12 IST

राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर हटविण्यात आले. 

अतुल आंबी

इचलकरंजी : स्वार्थासाठी काहीजणांनी राष्ट्रवादीतून फारकत घेतली असली तरी मूळ राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या विचारातून आम्ही पक्षाशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे त्यांच्यासोबतच राहण्याचा संयुक्त निर्णय  इचलकरंजी राष्ट्रवादीने घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार अशोक जांभळे व प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील राजकीय घडामोडीनंतर कारंडे-जांभळे गट कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले होते. त्यावरच स्थानिक व राजकीय समीकरणे अवलंबून होती. त्याबद्दल त्यांनी एकत्र बैठक घेऊन निर्णय जाहीर केला.जांभळे म्हणाले, बाप हा बाप असतो. शरद पवार यांनी नेहमी आम्हाला ताकद दिली. आता आम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना ताकद देणार आहे. कारंडे म्हणाले, ईडीची भीती घालून वेगळ्या पद्धतीचे राजकारण राज्यात सुरू आहे.  याचे कार्यकर्त्यांना दु:ख आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार हसन मुश्रीफ नेते असले तरी मूळ पक्ष म्हणून आम्ही शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले. तसेच आमच्यासोबत माजी आमदार राजीव आवळे, सर्व माजी नगरसेवक, तसेच शहरातील संपूर्ण राष्ट्रवादी एकसंघ असून, जयंत पाटील यांच्या माध्यमातून पक्षासोबत राहणार आहे. व शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी आज, बुधवारी मुंबई येथील पक्षाच्या बैठकीसाठी उपस्थित राहून पुढील निर्णय होईल, याप्रमाणे काम सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. यावेळी नितीन जांभळे, अब्राहम आवळे, उदयसिंह पाटील, माधुरी चव्हाण, आदी उपस्थित होते.

शहरातील महाविकास आघाडी राहणारशहरातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यासह अन्य सर्व घटक पक्ष, गट यांना सोबत घेऊन सुरू केलेली महाविकास आघाडी ठरल्याप्रमाणे कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यालयातून पोस्टर हटविलेशरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी कार्यालयातून अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचे पोस्टर हटविण्यात आले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेस