शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात ९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

By admin | Updated: November 29, 2014 00:30 IST

सुवर्ण विधानसौंध : प्रशासनाकडून जोरदार तयारी

बेळगाव : कर्नाटक सरकारचे दहादिवसीय हिवाळी अधिवेशन आगामी ९ डिसेंबरपासून बेळगाव येथील सुवर्ण विधानसौंध येथे भरणार आहे. राजधानी बंगलोरमधील अधिवेशनातील दहा दिवसांचे कामकाज बेळगाव येथे होणार असून, बेळगाव जिल्हा प्रशासनाने या अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी ९ ते २० डिसेंबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये बुक करण्यात आली आहेत. सर्व आमदार आणि सरकारी अधिकाऱ्यांची सोय हॉटेल आणि सभागृहांतून करण्यात येणार आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार दरवर्र्षी हिवाळी अधिवेशन बेळगावात घेत असते. या अगोदर २००६ मध्ये पहिल्यांदा तत्कालीन कुमारस्वामी सरकारने एका केएलएलई शिक्षण संस्थेच्या इमारतीत बेळगावात पहिले अधिवेशन घेतले होते. त्यानंतर २००८ मध्ये दुसरे अधिवेशन जेएनएमसी मेडिकल कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतर २०१२ व २०१३ साली बेळगावातील हलगा येथे नवीन बांधलेल्या विधानभवनात घेण्यात आला होता. आता याच ठिकाणी हे अधिवेशन भरत आहे. अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांचा मेळावा भरवणारच आहे, शिवाय बेळगावच्या नामांतरविरोधात व मराठी भाषेतून सरकारी परिपत्रिके देण्याच्या मागणीसाठी हलगा येथील सुवर्ण विधानभवनासमोर आंदोलन करण्याचे समितीने जाहीर केले आहे. २०१४च्या मास्टर प्लॅनअंतर्गत बेळगाव शहराच्या चारही बाजूची ३० हजार एकर सुपीक जमीन कर्नाटक सरकार ताब्यात घेणार आहे. या विरोधातही मराठी भाषिक शेतकरी आंदोलन करणार आहेत. अधिवेशनात गाजणार आंदोलनअधिवेशनात काँग्रेस सरकारला घेरण्यासाठी भाजप नेते आंदोलन करणार असून, भाजपच्या नेत्यांची बैठक होत आहे. याशिवाय उसाला दर देण्यासाठी शेतकरी आंदोलन आणि बेळगावात केएटी कर्नाटक प्रशासकीय लवाद बेळगावात व्हावे, यासाठी वकिलांचेही बेमुदत बंद आंदोलन सुरू असून, या अधिवेशनात हे आंदोलन गाजणार आहे.