कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST2020-12-26T04:19:27+5:302020-12-26T04:19:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून येथील कामकाज करू, अशी ...

Will work in coordination between staff and administration | कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून काम करणार

कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून काम करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय साधून येथील कामकाज करू, अशी ग्वाही नूतन तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. शुक्रवारी सकाळी त्यांनी पदभार स्वीकारला.

इंदुरकर म्हणाले, या कारागृहात कर्मचारी वर्ग कमी आहे. याची माहिती घेण्याचे काम सध्या करीत आहे. येथील कामकाज कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय साधून मी करणार आहे.जी घटना दोन दिवसांपूर्वी घडली, तशी घटना घडू नये याकरिता आतील बंदोबस्त जीन प्रशासनाने पाहायचा आहे, तर जीनबाहेरील बंदोबस्त पोलीस प्रशासनाने पाहायचा आहे. याबाबत दीक्षित समितीने निर्देशित केलेल्या सूचनेनुसार बाहेरील बंदोबस्त हा ज्याच्या पोलीस स्टेशनचा विषय आहे. रोज रात्री बाहेरून गस्त घालणे हे काम जिल्हा पोलीस प्रशासनाचे आहे. या गोष्टीची नोंद रजिस्टरमध्ये करणे ही त्यांची जबाबदारी आहे. यासोबतच कळंबा कारागृह आतील रुग्णालयाचा प्रश्नही महत्त्वाचा असून त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलणी करून त्यासंबंधी निर्णय घेण्याचे काम सुरू आहे.

चौकट

इंदुरकर हे मूळचे नागपूर येथील असून २९ वर्षांपूर्वी त्यांनी तुरुंग प्रशासनात तुरूंग निरीक्षक या पदावर कामाला सुरुवात केली.त्यानंतर नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, मुंबई, परभणी आणि येरवडा पुणे येथे उपअधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.

फोटो चंद्रमणी इंदुरकर यांचा फोटो कॉल्ड डेस्कवर मेल करीत आहे.

Web Title: Will work in coordination between staff and administration