शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काळम्मावाडी धरण फुटल्यावर शासन जागे होणार का ?, शिवसेनेची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:06 IST

गळतीचे काम न सुरू झाल्यास गुरुवारी जलसमाधी

कोल्हापूर : दूधगंगा (काळम्मावाडी) धरण फुटल्यावर सरकार जागे होणार आहे का ? राज्य शासन माणसे मरण्याची वाट पाहत आहे का ? धरणाची गळती त्वरित बंद करा, अन्यथा गुरुवारी (दि. ३० मे) शिवसेनेच्या वतीने त्याच धरणात जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांना देण्यात आला.या धरणाची गळती दूर करण्यात जलसंपदा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पोवार यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन देण्यात आले.सन १९९९ साली दूधगंगा धरणाचे काम पूर्ण झाले. १२२० मीटर लांबीचे दूधगंगा धरण गेली काही वर्षे मरण यातना भोगत आहे. यास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. सर्वसाधारण ७० लिटर / सेकंद यावर कोणत्याही धरणाची गळती वाढून चालत नाही. दूधगंगा धरणातून पाण्याची गळती वाढतच गेली आहे. ती दि. २३/०१/२०२१ रोजी २११.१० लिटर / सेकंद इतकी गळती आहे.धरण सुरक्षित संघटना नाशिक यांनी दि. १९/०४/२०२१ व ०१/११/२०२१ रोजी पावसाळ्यापूर्वी पाहणी केली असता, दगडी धरणातून गळतीचे प्रमाण ३३.६८ लिटर/ सेकंद व २६४ लिटर / सेकंद इतकी आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. दूधगंगा प्रकल्प अंतर्गत गळती प्रतिबंध उपाययोजना सन २०२२-२३ दर सूचीवर आधारीत विशेष दुरुस्तीसाठी ८० कोटी ७२ लाख ११ हजार ८५४ इतक्या निधीचा प्रस्ताव शासनास पाठवला आहे. परंतु अध्यापही दूधगंगा धरणाच्या गळतीचे काम सुरू झालेले नाही.शिष्टमंडळात विजय देवणे, संजय पवार, सुनील शिंत्रे, सरेश चौगले, उत्तम पाटील, सुनील मोदी, सागर पाटील, उत्तम शेटके, बापू किल्लेदार, एम. एन. पाटील, विक्रम पाटील, जमीर ताशिलदार, अनिल चौगले, विजय टिपुगडे, विशाल देवकुळे, संभाजी भोकरे, दिनेश परमार, महादेव कुकडे, राजू यादव, संजय जाधव, दिनेश साळोखे यांचा समावेश होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणShiv Senaशिवसेना