शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

कोल्हापूर हद्दवाढीसाठी पालकमंत्र्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालणार, सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:03 IST

‘गोकुळ’साठी वेळ मात्र हद्दवाढीसाठी वेळ नाही

कोल्हापूर : हद्दवाढप्रश्नी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वेळ द्यावा, बैठक घ्यावी, अशी मागणी कृती समितीतर्फे अनेकवेळा केली. त्यांना ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करण्यास वेळ आहे; पण शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हद्दवाढ विषयात ते बैठक घेत नाहीत, असा आरोप सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकऱ्यांनी रविवारी झालेल्या बैठकीत केला. याच प्रश्नी पालकमंत्री आबिटकर यांना कोणत्याही घेराव घालण्याचे आंदोलनही यावेळी जाहीर केले. महाराणा प्रताप चौकात बैठक झाली.माजी महापौर आर.के.पोवार म्हणाले, वर्ष १९७२ पासून हद्दवाढीसाठी लढत आहोत. यापूर्वीचे सरकार आणि आताचे सरकार या विषयात फसवत आहे. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महत्त्वाचे नेते, आमदार एकत्र येतात. तेच हद्दवाढीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिकेची निवडणूक नको, अशी भूमिका घेऊ. पालकमंत्र्यांनी या विषयात वेळ दिलेली नाही. त्यांना घेराव घालून जाब विचारू.

बाबा पार्टे म्हणाले, शहराची हद्दवाढ होण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर हेच फक्त प्रयत्न करीत आहेत. शहराचे आमदार असल्याने त्यांचे ते कर्तव्यही आहे; पण ते यात एकाकी पडत आहेत.आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांच्या भूमिका ‘व्हय बी म्हणत नाहीत आणि नाही बी म्हणत नाहीत’ अशी आहे. पालकमंत्री आबिटकर हे ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी आमदारांना एकत्र करून बैठका घेत आहेत; मात्र हद्दवाढीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून त्यांना कोणत्याही क्षणी घेराव घालून जाब विचारू. हद्दवाढ केली नाही तर पालकमंत्रिपदाची खुर्ची फार दिवस राहणार नाही, असेही त्यांना सांगू.सुशील भांदिगरे म्हणाले, हद्दवाढप्रश्नी नेते सोयीची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शिवाजी पुलावर चक्काजाम करून उग्र आंदोलन छेडू. ‘आप’चे संदीप देसाई, राजू जाधव, अशोक भंडारे, अनिल कदम यांची भाषणे झाली. बैठकीस कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आज खासदार यांच्यासोबत बैठकहद्दवाढ विषयावर खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत आमदार नरके, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ. याच्या नियोजनाच्या चर्चेसाठी आज, सोमवारी दुपारी १२ वाजता खासदार शाहू छत्रपती यांची सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होईल, असे पोवार यांनी सांगितले. बैठकीतच पोवार यांनी खासदार छत्रपती यांना मोबाइलवर संपर्क वेळ निश्चित केली.

राजारामपुरीपासून जागृतीला सुरुवातॲड. बाबा इंदूलकर म्हणाले की, हद्दवाढीसाठी आंदोलन उभारण्यासाठी शहरात व्यापकपणे जागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आज, सोमवारी सायंकाळी सहा वाजता राजारामपुरी तालीम कट्यावर बैठक होईल. या बैठकीनंतर शहरातील सर्व भागांत जागृतीसाठी बैठका होतील. जोपर्यंत हद्दवाढ होत नाही, तोपर्यंत आंदोलन तेवत ठेवू.

..तर प्रवेश कर लावारोज शहरात ग्रामीणमधील लोक आणि करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. याचा ताण शहरावर येत आहे. शहराच्या विकासाला निधी कमी पडत आहे. हद्दवाढ झाली नसल्याने विकास निधी भरीव मिळालेला नाही. पुढील काळात हद्दवाढ होणारच नसेल निधीसाठी शहरात येणाऱ्यांना प्रवेश कर लावा, अशी मागणी शिंदेसेनेचे किशोर घाटगे, काँग्रेसचे संपतराव पाटील यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्री