शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:23 IST

कुमार सप्तर्षी; महात्मा गांधी आणि राज्यघटनेच्या मार्गाने जाण्यातच देशाचे भले

कोल्हापूर : कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.

व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ताराराणी विद्यापीठाच्या वतीने क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेअंतर्गत ‘आधुनिक भारताची बांधणी’ या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी शुक्रवारी विचारपुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.सप्तर्षी म्हणाले, मनुस्मृतीला अपेक्षित राज्यकर्ते सध्या केंद्रात सत्तेवर आहेत. ते जे बोलतील तेच प्रमाण आणि तेच अंतिम असा कारभार सध्या सुरू आहे. कोणत्याही चर्चेविना निर्णय लादले जात आहेत. बहुमत हे स्थिरतेचे लक्षण असते; पण हेच पाशवी बहुमत देशासाठी काळ बनू पाहत आहे. आता जनतेनेच शहाणे होण्याची गरज आहे. गांधींनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यातच देशाचे भले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.जातीनिर्मूलन झाले तरच सर्व हिंदूदेशातील सर्व १३० कोटी जनता ही हिंदू आहे, या मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सप्तर्षी म्हणाले, हिंदू हा धार्मिक नव्हे तर प्रादेशिक शब्द आहे. हा धर्म आहे तर मग जातिपाती का आहेत, याचे उत्तर देऊन ते निर्मूलन झाल्याचे जाहीर करून मगच सर्वांना हिंदुत्वाच्या तराजूत तोलावे, असे त्यांनी सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक