नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:22 AM2019-12-28T06:22:50+5:302019-12-28T06:23:27+5:30

कुमार सप्तर्षी; महात्मा गांधी आणि राज्यघटनेच्या मार्गाने जाण्यातच देशाचे भले

Will not prove citizenship, put in harassment! | नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका!

नागरिकत्व सिद्ध करणार नाही, छळछावणीत टाका!

Next

कोल्हापूर : कोणतीही जात-धर्म न मानता देशात सन्मानाने जगण्याचा अधिकार घटनेने दिला असताना नागरिकत्व सिद्ध करण्याचा काढलेला फतवा ही मनुवादी केंद्र सरकारची मनमानी आहे. राज्यघटनेच्या आधीच्या जंजाळात अडकायचे की घटनेने दिलेल्या मार्गावरून पुढे चालायचे, हे निवडण्याची वेळ आली आहे. मी कोणतीही कागदपत्रे देणार नाही, मला खुशाल छळछावणीत टाका, असे आव्हानच ज्येष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिले.

व्ही. टी. पाटील स्मृतिभवनाच्या सभागृहात ताराराणी विद्यापीठाच्या वतीने क्रांतिवीर रंगरावदादा पाटील व्याख्यानमालेअंतर्गत ‘आधुनिक भारताची बांधणी’ या विषयावर डॉ. सप्तर्षी यांनी शुक्रवारी विचारपुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.
सप्तर्षी म्हणाले, मनुस्मृतीला अपेक्षित राज्यकर्ते सध्या केंद्रात सत्तेवर आहेत. ते जे बोलतील तेच प्रमाण आणि तेच अंतिम असा कारभार सध्या सुरू आहे. कोणत्याही चर्चेविना निर्णय लादले जात आहेत. बहुमत हे स्थिरतेचे लक्षण असते; पण हेच पाशवी बहुमत देशासाठी काळ बनू पाहत आहे. आता जनतेनेच शहाणे होण्याची गरज आहे. गांधींनी दाखवून दिलेल्या मार्गावरून जाण्यातच देशाचे भले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जातीनिर्मूलन झाले तरच सर्व हिंदू
देशातील सर्व १३० कोटी जनता ही हिंदू आहे, या मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सप्तर्षी म्हणाले, हिंदू हा धार्मिक नव्हे तर प्रादेशिक शब्द आहे. हा धर्म आहे तर मग जातिपाती का आहेत, याचे उत्तर देऊन ते निर्मूलन झाल्याचे जाहीर करून मगच सर्वांना हिंदुत्वाच्या तराजूत तोलावे, असे त्यांनी सुनावले.

Web Title: Will not prove citizenship, put in harassment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.