शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation: आंदोलन मोडीत काढू देणार नाही, मराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांना इशारा 

By संदीप आडनाईक | Updated: November 10, 2023 18:34 IST

'ओबीसी यादीचे पुनरिक्षण करा'

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन मोडीत काढू देणार नाही. विद्यमान ओबीसी यादीचे पुनरिक्षण करा, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळाविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, याची दखल घ्यावी, असा इशारा सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. या शिष्टमंडळात ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, प्रकाश पाटील, सुंदरराव देसाई, विजयानंद माने, सुधाकर भिसे, संगीता पाटील सहभागी झाले होते.पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. त्यावर कारवाई सुरू झाली आहे. मात्र, यासाठी कायदेशीर वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून मराठ्यांना आरक्षण देताना शासनाला कायदेशीर बाबींची आठवण येते आणि हे आरक्षण कायद्याच्या कचाट्यात कसे अडकेल, यासाठी विचार केला जातो, असा अनभव आहे. एकीकडे बिहारमध्ये एकूण आरक्षणाचा टक्का ७५ टक्क्यांवर जातो. विधानसभेत हे ७५ टक्के आरक्षण मंजूर होते, परंतु मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन भरविण्यासही आपण तयार होत नाही. राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय काही नव्या जाती, पोटजातींना ओबीसी यादीत समाविष्ट केेले. त्यांचा केंद्राच्या यादीत समावेश करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने त्याला अनुकुलता न दर्शविल्याने आपल्या सरकारने आता राज्य मागासवर्ग आयोगाकडे धाव घेतली आहे. परंतु, शिफारशीशिवाय ज्यांचा समावेश यादीत केला, त्यावर आयोगाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. असे असताना मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, आंदोलन मोडीत काढायचे म्हणून ओबीसीच्या यादीला धक्का न लावता आरक्षण देण्याची भाषा करण्यामागे सरकारचा हेतू स्वच्छ नाही. ते मोडीत काढण्यासाठी राज्य सरकारने २ जानेवारीपर्यंतची मुदत मागून घेतली आहे. परंतु, मराठा फसणार नाही. विद्यमान ओबीसी यादीचेच पुनरिक्षण करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणChief Ministerमुख्यमंत्री