राधानगरीतील नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST2021-07-30T04:25:22+5:302021-07-30T04:25:22+5:30

आमजाई व्हरवडे लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक घरांची पडझड व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ...

Will follow up for compensation in Radhanagari | राधानगरीतील नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार

राधानगरीतील नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार

आमजाई व्हरवडे

लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक घरांची पडझड व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी केले. तालुक्यात नुकसानग्रस्त भागांच्या भेटीवेळी ते बोलत होते.

कोणोली, म्हासुर्ली, कुंभारवाडी, शिरगाव, अशा गावातील शेतकऱ्यांचे पावसामुळे घर व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात गेली चार दिवस ए.वाय. पाटील यांनी भेटी देत शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे पाठपुरावा करीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगत शेतकऱ्यांना आधार दिला.

फोटो

नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करताना ए.वाय. पाटील. सोबत शेतकरी.

Web Title: Will follow up for compensation in Radhanagari