शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने सुरू राहणार की बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार येत्या दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये ...

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार येत्या दोन दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये औद्योगिक वसाहतींमधील कारखाने सुरू राहणार की बंद, याबाबतच्या नियमावलीची उद्योग क्षेत्राला प्रतीक्षा लागली आहे. जिल्ह्यातील विविध सात औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे तीन लाख कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून उद्योग सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली होती. यावर्षी वीकेंड लॉकडाऊनमध्येदेखील उद्योगांना सवलत देण्यात आली. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. त्याला रोखण्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. त्यावर उद्योग क्षेत्राची चाके थांबल्यास त्याचा मोठा फटका राज्याला बसणार आहे. त्यामुळे नियमावली कडक करून गेल्या वर्षीप्रमाणे आताही संपूर्ण लॉकडाऊनमध्ये औद्योगिक वसाहतींमधील कारखाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून उद्योजकांनी सरकारकडे केली आहे. कारखाने बंद राहिल्यास रोजगार मिळणार नाही. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राहणे परवडणार नसल्याने ग्रामीण भागासह परजिल्हा आणि राज्यातून आलेल्या कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आपल्या गावी जायचे की, कोल्हापूरमध्ये थांबायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

कामगार म्हणतात?

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेक कामगारांना ३० ते ४० टक्के पगार मिळाला. पगारवाढ झालीच नाही. कसाबसा घरखर्च चालविला. आता पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यास राज्य सरकारने प्रत्येक कामगारांना त्याच्या पगाराच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून द्यावी.

-नंदकुमार जाधव, गोकुळ शिरगाव.

आता कुठे एमआयडीसींमधील उद्योगांची चाके गतिमान झाली आहेत. लॉकडाऊनमुळे ती पुन्हा ठप्प झाली, तर ते आपल्याला परवडणार नाही. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्यात यावे.

-विजय मोहिते, रेंदाळ.