शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

चंदगड नगरपंचायतीचे स्वप्न सत्यात उतरणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:45 AM

चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे

ठळक मुद्दे नागरिकांच्या हक्कांची पायमल्ली ! : शासनाच्या चालढकलीमुळे नागरिकांत संताप, पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेतच

नंदकुमार ढेरे ।चंदगड : चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून नागरी जीवन जगण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंदगड शहरवासीयांना नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी शासनाची सुरू असलेली चालढकल यामुळे नागरिकांत तीव्र संताप आहे. याचा परिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला चंदगड तालुका. तालुक्याची वाढती लोकसंख्या नागरी वस्तीकडे वाटचाल करीत आहे. निसर्गाच्या वरदानामुळे तालुक्याला मोठा नावलौकिक मिळाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चंदगडची छोट्या शहराकडे वाटचाल सुरू आहे.केवळ ब्रिटिश काळापासून ‘महाल’चा दर्जा मिळाल्यामुळे या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये आहेत. दूरवर ख्याती असलेल्या प्राचीन देव श्री रवळनाथ मंदिर, मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू, तलाव, धुण्याचे कुंड, लहान मोठी-मंदिरे, सध्या जीर्णोद्धार केलेले रवळनाथ मंदिर, बाबा गार्डन, नामवंत काजू प्रक्रिया कारखाने, शाळा, महाविद्यालय, विविध प्रकारचे व्यवसाय, आदी कारणांमुळे चंदगडचा विस्तार पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तरकडे विस्तारलेला आहे.

तालुक्याला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे शासनाचे काम आहे. मागील शासनाने तालुक्याच्या ठिकाण असलेल्या सर्व ग्रा. पं.ना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव जारी केला होता. त्यानुसार चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा मिळालाच पाहिजे. नगरपंचायतीसाठी लागणारे सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही केवळ राजकीयदृष्ट्या चंदगडला नगरपंचातीचा दर्जा देताना वंचित ठेवले आहे.

चंदगडनजीकच्या आजरा शहराला मात्र नगरपंचायतीचा दर्जा देताना शासनाला कोणतीच अडचण आली नाही. मात्र, चंदगडसाठी हात अकडता घेण्यात आला. त्यामुळे भेदाची वागणूक स्पष्ट झाली. पालकमंत्री चंद्रकांतपाटील यांनी चंदगडला मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून केलेले भाष्य पोकळ ठरले.1 चंदगडवासीयांनी नगरपंचायतीच्या मागणीसाठी उभारलेला लढा अगदी सनदशीर आहे. चंदगडवासीय नागरिक आग्रही आहेत; पण संयमी आहेत. ते आपला हक्क लोकशाही मार्गाने मिळवतील. नगरपंचायतीच्या मागणीच्या लढ्यासाठी श्रद्धास्थान असलेल्या श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात पहिली बैठक घेण्यात आली.

2 याठिकाणापासून लढ्याची दिशा ठरवित सनदशीर लढा सुरू करण्यात आला. अखेरच्या टप्प्यात पावसाळ्यापूर्वी नवीन प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. राजकीय स्थानिक नेत्यांनीही पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. मात्र, राजकीय वजन कमी पडल्याने चंदगडच्या नगरपंचायतीचा निर्णय लोबंकळत राहिला आहे.

3 नागरिकांच्या सनदेतील एका भागानुसार जे गाव नागरी वसाहतीकडे वाटचाल करीत आहे. ज्या गावची लोकसंख्या १५००० ते २५००० दरम्यान आहे. भौगोलिक क्षेत्राची वाढ होऊन वस्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे, अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन करता येते, हे खुद्द नागरिकशास्त्र सांगते. मात्र, चंदगडला शासन ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यापासून का वंचित ठेवत आहे? हे मात्र न सुटणारे कोडे आहे.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर