शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नाश्ता वेळेत न आणल्याच्या रागातून पत्नीचा खून, भावाला सांगून पती फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 17:14 IST

मानेवर विळ्याचा वार

गडहिंग्लज : उसाची लावण करत असताना न्याहरी वेळेत न आणल्याच्या रागातून विळ्याने वार करून पतीने पत्नीचा जीव घेतला. सुशीला मारुती बेळाज (रा. खणदाळ, ता. गडहिंग्लज) असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती मारुती शिवाप्पा बेळाज याच्याविरुद्ध पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे नूल-हलकर्णी परिसरासह गडहिंग्लज तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी: मूळचे हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील रहिवासी असलेले मारुती बेळाज हे पत्नी सुशीला, मुलगा बसवराज, सून सुप्रिया यांच्यासह खणदाळ येथील बाळूमामा मंदिराच्या उत्तरेकडील कंकणवाडी-बेळाज वसाहतीत राहतात.वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्याची शेती कसायला घेतली आहे. सोमवारी (२५) नूल येथील शेतमालक सावंत यांच्या शेतात उसाची लावण सुरू होती. त्यावेळी पत्नी सुशीला हिने सकाळी न्याहरी वेळेत आणली नाही म्हणून मारुतीने तिला शिवीगाळ केली.सायंकाळी मारुतीचा मुलगा बसवराज व सून सुप्रिया हे दोघेही देवदर्शनासाठी नूल येथील सुरगीश्वर मठाला गेले होते. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास मारुती व सुशीला यांच्यात पुन्हा वादावादी झाली. ‘न्याहरी’चा राग मनात धरून विळ्याने तिच्या मानेवर उजव्या बाजूला वार केला. विळ्याचा वार वर्मी बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, घटनास्थळी परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक हर्षवर्धन बी.जे., उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली. बसवराज बेळाज यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

‘सुशीला’ला संपवले आहेमारूती हा शेती व जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होता. दारूच्या व्यसनामुळे वारंवार भांडण काढून तो पत्नी सुशीला हिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. दारूच्या नशेतच त्याने घराच्या दारातच विळ्याने वार केल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर शेजारी राहणारा भाऊ चन्नाप्पाच्या घरात जाऊन ‘मी सुशीला’ला संपवले आहे’, असे सांगून तो घराच्या पाठीमागील शेतात निघून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस