शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: चारित्र्याच्या संशयातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 12:57 IST

वठार तर्फ वडगाव येथील घटना : चार दिवसांची झुंज अपयशी

पेठ वडगाव : वठार तर्फ वडगाव येथे चारित्र्याच्या संशयातून चार दिवसांपूर्वी खुनी हल्ला करण्यात आलेल्या पत्नीचा आज बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव पोलिसांत पतीविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. पतीने पत्नीला डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून जखमी केले होते.आयेशा सलमान पटेल (वय २६, रा. वाठार, ता. हातकणंगले), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पती सलमान उमर पटेल यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत अबू गुलाब मुल्ला (रा. तासगाव, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली.घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुल्ला यांची इचलकरंजीतील मेव्हणी जहारा उमर पटेल यांचा मुलगा सलमान पटेल याचे आयेशा मुल्ला बरोबर २५ डिसेंबर २०१९ मध्ये लग्न झाले होते. दरम्यान, जावई सलमान उमर पटेल, रा. वाठार हा शिरोली एमआयडीसी येथे नोकरीस आहे. लग्न झाल्यापासून उमर हा आयेशाला वारंवार चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. याबाबत तिचे वडील अबू व आई शाकिरा यांनी दोघांनी समजावून सांगितले होते; पण उमरच्या स्वभावात काहीही फरक पडत नव्हता.शनिवारी (दि.२२) दुपारी सलमान हा कामावरून घरी आला. यावेळी दोघा पती- पत्नीत भांडण झाले. दरम्यान, रात्री १२:३० वाजेच्या सुमारास खोलीत आयेशा मोठ्याने ओरडत होती. अचानक ती बोलायची गप्प झाली, तसेच तिच्या शेजारी मसाला वाटण्याचा दगड पडलेला होता. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. त्यामुळे नातेवाइकाच्या मदतीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, शनिवारी (दि.२२) पहाटे ४ वाजता मेव्हणी जहारा हिने आयेशा बाथरूममध्ये पाय घसरून पडली आहे, असा फोन करून निरोप दिला. तिच्या डोक्याला मार लागल्याचे सांगितले. यावेळी सलमानने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर माहेरचे नातेवाईक तात्काळ सीपीआर रुग्णालयात आले. यावेळी तिला बेशुद्धावस्थेत उपचारार्थ दाखल केल्याचे समजले. यावेळी डॉक्टरांकडे नातेवाइकांनी चौकशी केली असता, डोक्यात मारहाण झाल्याचे सांगितले. बुधवारी उपचार सुरू असताना आयेशाचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंके, पोलिस निरीक्षक विलास भोसले, पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांनी भेट दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक भीमगोंड पाटील, रामराव पाटील करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस