कर्नाटकाच्या सीमारेषेवर या वाहनांच्या अनेक रांगा कशासाठी... त्यांची इच्छा पूर्ण होईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 01:23 PM2020-05-06T13:23:58+5:302020-05-06T13:25:31+5:30

कोल्हापूर : कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची कोगनोळी फाट्यावर गर्दी वाहनांच्या लांबच लांब रांगा केंद्र सरकारने चार मेपासून लोक डाऊन ...

 Why so many queues of these vehicles on the border of Karnataka ... will their wish come true? | कर्नाटकाच्या सीमारेषेवर या वाहनांच्या अनेक रांगा कशासाठी... त्यांची इच्छा पूर्ण होईल का?

कर्नाटकाच्या सीमारेषेवर या वाहनांच्या अनेक रांगा कशासाठी... त्यांची इच्छा पूर्ण होईल का?

Next
ठळक मुद्देअशा प्रवाशांसाठी कोगनोळी फाट्यावर त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरून घेतला जातो व काही वेळाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती आल्यानंतरच त्यांना प्रवेश द

कोल्हापूर : कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रवाशांची कोगनोळी फाट्यावर गर्दी वाहनांच्या लांबच लांब रांगा
केंद्र सरकारने चार मेपासून लोक डाऊन थोड्याफार प्रमाणात शिथिल केला आहे त्यामुळे आपापल्या राज्यात व जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे अशाप्रकारे महाराष्ट्रातून कर्नाटकात किंवा केरळ तामिळनाडू या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांनी कोगनोळी फाट्यावर गर्दी केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या पाचशे मीटरपर्यंत रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे

अहमदाबादहून येणारे मदरशांचे काही विद्यार्थी असतील किंवा इतर राज्यांमधून कर्नाटक केरळ तामिळनाडू अशा ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी असतील त्यांची कोगनोळी फाट्यावर गर्दी झालेली पहावयास मिळत आहे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ज्या जिल्ह्यातून बाहेर पडले तेथील बाहेर पडताना चा इ पास उपलब्ध आहे परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये प्रवेश करावयाचा आहे त्या जिल्ह्याचा प्रवेश पास त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने कोगनोळी फाट्यावर त्यांना तिष्ठत राहावे लागत आहे अशा प्रवाशांसाठी कोगनोळी फाट्यावर त्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरून घेतला जातो व काही वेळाने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती आल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो


 

Web Title:  Why so many queues of these vehicles on the border of Karnataka ... will their wish come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.