शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

OBC reservation: ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार गप्प का? प्रवीण दरेकर यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:47 IST

Praveen Darekar, OBC reservation: मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

 चंदगड -  मध्य प्रदेश सरकार ओबीसी आरक्षण देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ शकतय पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गप्प का?असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. बुधवारी भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांच्या इनाम सावर्डे (ता. चंदगड) येथील निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, केवळ धनदांडग्यांसाठीच हे महाविकास आघाडी सरकार ओबीसी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मध्य प्रदेश सरकारने पूर्ण सोपस्कार करून ओबीसी आरक्षण दिले आहे. पण फक्त दिखाऊपणा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता ओबासी आरक्षण मिळवून देऊन आपली भूमिका पार पाडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

शिवाजीराव आणखीन थोडा जोर लावाचंदगड विधान मतदारसंघात खूप कमी काळात भाजपाची ताकद निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी होत आहात. त्यामुळे आणखीन थोडा जोर लावा व हा विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळवून द्या यासाठी पक्ष तुमच्या सदैव पाठीशी असल्याचा कानमंत्रही भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांना विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर देण्यास विसरले नाहीत. 

यावेळी माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, जिल्हा सरचिटणीस रविंद्र बांदिवडेकर, सुरेश सातवणेकर, सुनील काणेकर, अशोक कदम, तुकाराम बेनके यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. इनाम सावर्डे येथे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे स्वागत भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी केले. यावेळी तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, माजी रोहयो मंत्री भरमूआण्णा पाटील उपस्थित होते.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाchandgad-acचंदगडkolhapurकोल्हापूर