शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन रात्रीच्या अंधारात का?, शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 16:32 IST

अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली.

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला असे काय झाले होते की तातडीने मूर्तीचे संवर्धन करावे लागले. रात्री कोणतेही धार्मिक कार्य करणे चुकीचे असताना रात्री आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवून रासायनिक प्रक्रिया का करण्यात आली, हे करताना समिती का नेमली नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीवर मोर्चा काढण्यात आला.सचिव शिवराज नाईकवाडे यांना निवेदन दिल्यानंतर कोणत्या व्यक्तींनी आणि शासनस्तरावर काय पत्रव्यवहार झाला, कोणामुळे हे घडले, याची माहिती मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. आज शनिवारी ही कागदपत्रे कार्यकर्त्यांना सुपूर्द केली जाणार आहेत.अंबाबाईची मूर्ती दुखावल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत तातडीची संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. हे करताना कमालीची गोपनीयता पाळली गेली. हे उघडकीस आल्यानंतर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी देवस्थान समितीवर मोर्चा काढून जाब विचारण्यात आला. विजय देवणे म्हणाले, एका पुजाऱ्याने सांगितले म्हणून पुरातत्व खात्याने तातडीने संवर्धन प्रक्रिया केली, असे होणार नाही. त्यामुळे कोणत्या मंत्र्यांनी, सरकारने हस्तक्षेप करत ही प्रक्रिया केली, हे उघड झाले पाहिजे. प्रशासनानेदेखील कुणाच्या सांगण्यावरून हे केले स्पष्ट व्हावे. रवी इंगवले यांनी याला जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाईची मागणी केली.मुनीश्वर यांचा पाठपुरावा..देवस्थानचे सचिव नाईकवाडे यांनी ही प्रक्रिया व्हावी, यासाठी पुजारी गजानन मुनीश्वर यांनी पाठपुरावा केला. देवस्थान समितीने हा प्रस्ताव पाठवला नव्हता. समितीलादेखील निर्णय आल्यावरच कळाले असल्याचे सांगितले. आज शनिवारी या प्रक्रियेची कागदपत्रे कार्यकर्त्यांना दिली जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरShiv Senaशिवसेना