बलराम कॉलनीत कोण बलवान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST2021-01-13T04:59:43+5:302021-01-13T04:59:43+5:30

सोडविलेले प्रश्न २५ वर्षांपासून लक्षतीर्थ वसाहत व बलराम कॉलनीला जोडणारा माने व कसबेकर पाणंद, टेंबलाई मंदिर ते लक्षतीर्थ वसाहती, ...

Who is strong in Balram Colony? | बलराम कॉलनीत कोण बलवान?

बलराम कॉलनीत कोण बलवान?

सोडविलेले प्रश्न

२५ वर्षांपासून लक्षतीर्थ वसाहत व बलराम कॉलनीला जोडणारा माने व कसबेकर पाणंद, टेंबलाई मंदिर ते लक्षतीर्थ वसाहती, रस्त्याचे रखडलेले काम सध्या ६० फुटांनी रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात. घंटागाडीमुळे दररोज कचरा उठाव होत असल्याने १२ कचरा कुंड्या बंद होऊन तीनच शिल्लक. पांडुरंग माने सांस्कृतिक हॉलचे नूतनीकरण करून सर्व सोयींनीयुक्त लोकांना उपलब्ध.

रखडलेले प्रश्न

येथील काही घरांना प्रॉपर्टी कार्डे मिळालेली नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. मुलांना खेळाचे मैदान नाही. काही गल्ल्यांत गटारी, रस्त्यांचे काम पूर्ण नाही.

कोट

प्रभागातील प्रत्येक विकासकामावर लक्ष केंद्रित करून तो पूर्ण करण्याबरोबरच कोरोना महामारीच्या काळात प्रभागातील जनतेच्या अडीअडचणी दूर केल्या आहेत. काही ठिकाणी तांत्रिक कारणामुळे व कोरोनाच्या काळात शासन निधी उपलब्ध झाला नसल्याने गटारी व रस्त्याचे काम थांबले; पण शासन व जनतेचे सहकार्य घेऊन तेही निकालात काढणार आहे.

- राहुल माने (नगरसेवक)

फोटो : प्रभाग क्रमांक ५२

बलराम कॉलनी व लक्षतीर्थ वसाहतीला जोडणाऱ्या माने व कसबेकर पाणंद टेंबलाई मंदिर ते लक्षतीर्थ वसाहती रस्त्याचे काम रखडलेले असून सध्या ६० फुटाने रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली

मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना पडलेली मते १) राहुल शिवाजी माने - २२६४ अपक्ष २) गणेश रमेश खाडे - १३५१ ताराराणी-भाजप ३) नंदकुमार यशवंत सूर्यवंशी - ८१२ काँग्रेस ४) तुषार रामचंद्र लोहार - ६९ राष्ट्रवादी ५)संजय शामराव चव्हाण - ४६ सेना.

प्रभाग नं ५२, बलराम कॉलनी, विद्यमान नगरसेवक - राहुल माने; आताचे आरक्षण - ओबीसी महिला.

Web Title: Who is strong in Balram Colony?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.