शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीचा नवा नगराध्यक्षा कोण ?

By admin | Updated: October 8, 2015 00:23 IST

आज निवडणूक : भाजपने पारकर गटाला पाठिंबा दिल्याने उत्सुकता शिगेला

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी गुरूवारी निवडणूक होत आहे. काँग्रेस अंतर्गत दोन गटांमध्येच नगराध्यक्षपदासाठी चढाओढ आहे. यातील पारकर गटाला भाजपचा पाठिंबा असल्याचे बुधवारी सायंकाळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. कणकवली नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुविधा साटम कि पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यापैकी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.कणकवली नगरपंचायतीमध्ये एकुण १७ जागा असून त्यात काँग्रेसचे १३ सदस्य (पारकर समर्थक मिळून), शिवसेनेचे ३ आणि भाजपचा एक असे पक्षीय बलाबल आहे. यात पारकर गटाच्या चार सदस्यांनी माधुरी गायकवाड यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसतर्फे सुविधा साटम यांनी अर्ज भरला आहे. पारकर गटाचे ४ आणि विरोधी गटाचे (सेना-भाजप मिळून ) ४ असे ८ सदस्य होत आहेत. तर काँग्रेसच्या उर्वरीत ९ सदस्यांपैकी एखाद्या सदस्याने जरी पारकर गटाला मतदान केले तर माधुरी गायकवाड नगराध्यक्ष होवू शकतात. यापूर्वी भाजपाच्या राजश्री धुमाळे यांनी आपण या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची भूमिका घेतली होती. मात्र, बुधवारी जठार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केल्याने नगराध्यक्ष निवडणुकीतील चुरस वाढली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेस मात्र निवांतकाँग्रेसच्या १३ पैकी पारकर समर्थक ४ नगरसेवक वगळता ९ जण उमेदवारी अर्ज दाखल करताना एकत्र होते. त्यामुळे त्या ९ जणांनी ठामपणे सुविधा साटम यांना मतदान केल्यास काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नगराध्यक्ष होवू शकतात. गेले दोन दिवस काँग्रेसचे सर्व नगरसेवक निवांत असून आता प्रत्यक्षात गुरूवारी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.पारकर काँग्रेसमुक्त अभियानात सहभागी होतीलआमच्या कॉँग्रेसमुक्त अभियानात संदेश पारकर सहभागी होतील, असे ठामपणे वाटते. तसे झाले नाही तर पारकर यांची राजकारणातील ही शेवटची उचकी ठरेल. पारकर भाजपमध्ये येणार की नाही हे त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर सोडून देतो, असे प्रमोद जठार यांनी बुधवारच्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.