शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोण आदित्य ठाकरे? विचारणाऱ्या तानाजी सावंतांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 13:06 IST

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड ...

कोल्हापूर : युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची राज्यात झंझावाती शिवसंवाद, निष्ठा यात्रा सुरु आहे. या यात्रेला शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा दुसऱ्या टप्यादरम्यान काल, सोमवारी आदित्या ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यात पोहचले आहेत. काल कोल्हापुरात झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा बंडखोरांवर निशाना साधला. आज ते कोल्हापूरमधून जयसिंगपूरला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा त्यांनी बंडखोरांवर तोफ डागली. यावेळी त्यांना बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केलेल्या टीकेबाबत विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष करत सावंतांवर बोलणं टाळलं.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, हा माझा राजकीय दौरा नाही, लोकांचे प्रेम मिळवण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जनता आम्ही उद्धव ठाकरे सोबत असल्याचे सांगत आहे. शिवसेनेला, ठाकरे कुटुंबियाला एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र जनता आम्हाला कधीही एकटे पडू देणार नाही. गद्दारांचे गेली एक महिना जे नाटक सुरु आहे, की आमच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे, आदित्यबद्दल प्रेम आहे मात्र गद्दारांचे खरे चेहरे आता दिसू लागले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.गद्दार हा गद्दारच असतो, हे सरकार बेकायदेशीर असून ते लवकर कोसळणार असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केला. गद्दारीचा हा पॅटर्न इतर राज्यात जायला लागला तर देशात अस्थिरता निर्माण होवू शकते अशी चिंता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर, या बंडखोरांचा जनताच निकाल लावेल. 33 दिवस होऊनही अजून सरकारला तिसरा माणूस सापडलेला नाही. दोघांचेचं जम्बो कॅबिनेट आहे. अन् नेमकं खरा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न पडल्याची खोचक टीका देखील केली.  आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले तानाजी सावंतआदित्य ठाकरे कोल्हापुरानंतर आज पुण्यातील कात्रज चौकात तानाजी सावंत यांच्या बंगल्याच्या काही अंतरावर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यावरून तानाजी सावंत यांनी टीका करत, हे शक्तिप्रदर्शन नव्हे तर शक्तीपात झाला आहे. शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आली आहे. शिवसेना म्हणून एकही शिवसैनिक राहिला नाही. आदित्य ठाकरेंची शेवटची धडपड सुरू आहे. कोण आदित्य ठाकरे? काय संबंध? आदित्य ठाकरे हा एक आमदार आहे यापेक्षा फारसं महत्त्व देत नाही. आदित्य ठाकरे असो किंवा अन्य कुणी ज्यांनी सभा आयोजित केली असेल त्यावर मी लक्ष देत नाही असा टोला तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरेंना लगावला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेTanaji Sawantतानाजी सावंत