शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शिक्षणाचा वादा.. मुलींना फीसाठी तगादा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच काही महाविद्यालयांमध्ये प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:50 IST

कारवाईची मागणी

कोल्हापूर : तळागाळातील विद्यार्थिनींना उच्चशिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली, त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र, सरकारकडूनमहाविद्यालयांना दिली जाणारी प्रतिपूर्ती रक्कमच मिळाली नसल्याने सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयांनी मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. सरकारच आम्हाला पैसे देत नाही तर आम्ही तुम्हाला कसे मोफत शिक्षण द्यायचे, असा सवाल या महाविद्यालयांकडून केला जात आहे.मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार उच्चशिक्षणमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. त्याची प्रतिपूर्ती रक्कम सरकारकडून महाविद्यालयाला दिली जात आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे.

विशेष म्हणजे, ही योजना सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षी या महाविद्यालयांनी पात्रताधारक मुलींना एकही रुपया शुल्क घेतले नाही. मात्र, दुसऱ्या वर्षी सरकारकडून पैसेच मिळाले नसल्याचे सांगत पैसे भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकही हतबल झाले आहेत.

कारवाईचा उरला नाही धाकराज्य सरकारने मोफत शिक्षण योजना सुरू केल्यानंतर काही महाविद्यालयांनी मुलींकडून शैक्षणिक शुल्क मागण्याचा प्रयत्न केला असता अशा महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या होत्या. असे शैक्षणिक शुल्क कोण मागणी करीत असेल तर थेट उच्च व तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालकांकडे तक्रार करण्याचे आवाहनही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले होते. कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देऊनही काही महाविद्यालये खुलेआम शुल्क मागत असल्याने शिक्षण विभागाच्या कारवाईचा धाक उरला नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

त्या महाविद्यालयाकडून खुलेआम शुल्काची मागणीकोल्हापूर शहरातील एका विधि महाविद्यालयाने तृतीय वर्षातील मुलींना शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावला आहे. सरकारकडून पैसे आले नाहीत, शुल्क भरा अशी मागणी होऊ लागल्याने विद्यार्थिनींसह पालकांना काही सुचेनासे झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीGovernmentसरकार