शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅन रस्त्यातच बंद पडली, आरोपींसह पोलिसांची कोर्टापर्यंत पायपीट, कोल्हापूर पोलिसांचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:53 IST

अशावेळी एखाद्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली असती तर अनर्थ घडला असता.

कोल्हापूर : मोक्का कारवाईत जामीन मिळालेल्या इचलकरंजीतील गुंडाचे मिरवणुकीने स्वागत केल्याप्रकरणी अटकेतील पाच संशयितांना बुधवारी (दि. २३) जुना राजवाडा पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. जिल्हा न्यायालयाकडे जाताना सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर आरोपींना घेऊन जाणारी पोलिस व्हॅन बंद पडली आणि पोलिसांना आरोपींसह जिल्हा न्यायालयापर्यंत पायपीट करावी लागली. या घटनेमुळे जुना राजवाडा पोलिसांचा भोंगळ कारभार समोर आला.मोक्का कारवाईत कळंबा कारागृहात रवानगी झालेला इचलकरंजीचा गुंड अजित नाईक याची जामिनावर सुटका झाल्यानंतर ३५ ते ४० जणांनी त्याचे मिरवणुकीने स्वागत केले. त्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संशयितांमधील पाच जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी (दि. २२) अटक केली.

शुभमकुमार कदम (वय २३, रा. कसबा आळते, ता. हातकणंगले), सूरज महादेव पाटील (वय २६, रा. इचलकरंजी), अनिकेत वसंतराव नरळे (वय २१, रा. इचलकरंजी), साजिद ऊर्फ टिपू दस्तगीर नाईक (वय ३०, रा. शाहूनगर, कागल) आणि गणेश सुरेश आडेकर (वय २६, रा. इचलकरंजी) या अटकेतील संशयितांचा ताबा जुना राजवाडा पोलिसांकडे देण्यात आला.अटकेतील संशयितांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यासाठी जुना राजवाडा पोलिस व्हॅनमधून निघाले होते. सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर पोहोचताच पोलिसांची व्हॅन बंद पडली. चालकाने व्हॅन दुरुस्तीचा प्रयत्न केला; मात्र व्हॅन दुरुस्त झाली नाही. अखेर बेडीबंद आरोपींना घेऊन पोलिसांनी कोर्टापर्यंत पायपीट केली. सुमारे दोन किलोमीटर अंतर चालत आरोपी आणि पोलिस कोर्टात पोहोचले. न्यायाधीशांनी अटकेतील संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, गुंडाचे मिरवणुकीने स्वागत करणाऱ्या आणखी सात जणांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली.पोलिसांचा कारभार चव्हाट्यावरऐनवेळी व्हॅन बंद पडल्यानंतर दुसरे वाहन बोलावून आरोपींना कोर्टात हजर करता आले असते; मात्र पोलिसांनी पायपीट करत कोर्ट गाठले. अशावेळी एखाद्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली असती तर अनर्थ घडला असता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस