मूर्ती विसर्जन करताना युवक गेला वाहून; दैव बलवत्तर म्हणून आठजण वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 15:59 IST2024-10-13T15:59:06+5:302024-10-13T15:59:16+5:30
ही घटना दि. १२ शनिवार रोजी रात्रौ बारा वाजता रूई बंधारा येथे घडले.

मूर्ती विसर्जन करताना युवक गेला वाहून; दैव बलवत्तर म्हणून आठजण वाचले
रुकडी माणगाव- दुर्गामाता मूर्तीचे विसर्जन करताना माणगाव ता.हातकणगंले येथील प्रकाश शिवाजी परीट (वय ३५) हा युवक वाहून गेले .अन्य आठजण दैव बलवत्तर म्हणून वाचले. ही घटना दि. १२ शनिवार रोजी रात्रौ बारा वाजता रूई बंधारा येथे घडले.
मिळेलेल्या माहितीनुसार, माणगाव येथील गांधी चौक तरूण मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी दुर्गामाता मूर्ती चे प्रतिष्ठा केले जाते. शानिवार रोजी मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता रूई येथील पंचगंगा नदीवरील बंधारा नजीक मंडळाचे वीस तीस कार्यकर्ते गेले होते. मूर्ती घेवून आठ कार्यकर्ते नदीपात्रात गेले असता. विसर्जन वेळी मूर्ती फिरल्याने कार्यकर्ते नदीतच कोसळले. पाण्याला प्रचंड वेग असल्याने परीटसह अन्य कार्यकर्ते वाहून गेले. यातील चार पाच युवक बंधाराला असलेल्या लाकडी फळीस धरून बसल्याने ते थोडक्यात बचावले. त्यांना दोरखंडच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. अन्य कार्यकर्ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर बंधाऱ्यातून वाहत गेले असता यापैकी अन्य युवक पोहत नदी कडेला पोहचले. तर यामध्ये परीट हा वाहून गेला. त्याचे रात्री उशीरा पर्यत शोध घेण्यात आले पण तो मिळून आला नाही.
दरम्यान, दि.१३ रविवार रोजी पहाटे मंडाळाचे कार्यकर्ते त्याला शोधण्यासाठी गेले असता तो सापडला नाही. त्यांचे शोध घेण्यासाठी जीवरक्षक गटाला पाचारण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, दि.१२ रोजी प्रकाश परीट व त्यांची पत्नी दोघांनी मुर्तीचे पूजा व आरती केली होती. त्यानंतर चार तासाने ही घटना घडले. परीट यास आठ वर्षांचा मुलगा व आठ महिन्यांचे कन्या आहे. ही घटना गावात पसरताच हळहळ व्यक्त होत आहे.